www.24taas.com, झी मीडिया, डेट्रायट (अमेरिका)
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती पाहून कधीन कधी, आपल्यातल्या प्रत्येकाच्या डोक्यात असा विचार नक्कीच आला असेल की पाण्यावर चालणारी कार असती तर...! ही कल्पनाही आता प्रत्यक्षात येणार असं दिसतंय.
बाजारात पाण्यावर चालणारी कार आणायची... अशी कल्पना आणि चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती... अशी कार बनवता येणार की नाही? प्रत्यक्षात ही कार लोकांपुढे कधी येणार? हे सांगणं जरा अवघडच होतं. पण, मिळालेल्या माहितीनुसार, कोरियाची ऑटोमोबाइल कंपनी ‘ह्युन्दाई’नं या कल्पनेला प्रत्यक्षात उतरवलं आहे. पुढच्या वर्षापर्यंत हायड्रोजनवर चालणारं वाहन लोकांसमोर आणण्याचा निर्धार या कंपनीनं व्यक्त केलाय. कंपनी आपली ‘हायड्रोजन फ्यूएल सेल’ कार ‘टकसोन एसयूव्ही’ला पुढच्या वर्षी लॉन्च करणार आहे.
ही पहिलीच गाडी आहे, जिची विक्री अमेरिकेत होणार आहे. या महत्त्वपूर्ण क्षणांसाठी सर्व गोष्टी आता तयार आहेत. कंपनी लवकरच ‘टकसोन’विषयी अधिकृत घोषणा करण्याच्या तयारीत आहे, असं ‘ह्युन्दाई’चे उत्तरी अमेरिकाचे मुख्य कार्यकारी जॉन क्राफकिक यांनी मागच्या आठवड्यात म्हटलंय.
वाहन उद्योगचं लक्ष बॅटरी आणि इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या कारवर होतं. परंतु ‘ह्युन्दाई’, ‘होंडा’ आणि ‘टोयाटो’ने फ्यूएल सेलवर संशोधन सुरूच ठेवलंय. त्यामुळे इंधनाच्या समस्येवर उपाय मिळालाय, अशी आशा निर्माण झालीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.