राशीभविष्य पाहाताना त्यावेळेचे ग्रहब, नक्षत्र पाहून पंचांग पाहिले जाते. याच्या आधारावर भविष्य ठरतं. 12 राशींसाठी गुरुवार 16 जानेवारी हा दिवस कसा असणार आहे? पाहा खालील राशीभविष्यातून.
मेष
आजचा दिवस तुमच्यासाठी बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण करण्याचा असेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला मोठे यश मिळू शकेल. तुम्ही काम आयात आणि निर्यात करू शकता. मुलांना परीक्षेत चांगले यश मिळेल.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सुख-सुविधांनी भरलेला असेल. आजचा दिवस अतिशय आनंदान आणि मजेत घालवला जाणार आहे. प्रेमसंबंधात वाढ होईल, नाती सुधारतील. तुमच्या भावांना तुमचं बोलणं पटणार नाही. त्यामुळे बोलताना सावध.
मिथुन
आजचा दिवस तुमच्यासाठी काहीतरी नवीन करण्याचा असेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुम्ही कोणताही निर्णय खूप विचारपूर्वक घ्यावा. तुम्ही तुमच्या कामात काही बदल करू शकता, ज्यामुळे तुमच्या समस्या वाढतील. तुम्हाला संतुलित आहार घ्यावा लागेल.
कर्क
आजचा दिवस कर्क राशीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. रखडलेली सर्व कामे आज पूर्ण कराल. व्यवसायात अनेक दिवसांपासून तुम्हाला मिळणार काम आज मिळेल. कौटुंबिक कामाबाबत घराबाहेर जाणं टाळा. संपत्तीबाबत योजना आखा.
सिंह
आजचा दिवस अतिशय लाभदायक असणार आहे. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी दिवस महत्त्वाचा. जोडीदाराकडून खास सरप्राईज भेट होऊ शकते. नोकरीसंदर्भात बाहेर गावी जाण्याची वेळ येईल. प्रमोशन किंवा कामाशी संबंधित गोड बातमी कानावर पडेल.
कन्या
आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला जाणार आहे. जर तुम्ही तुमच्या गरजेनुसार खर्च केलात तर ते तुमच्यासाठी चांगले होईल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगला नफा मिळेल. तुमच्या कोणत्याही गैरसमजांपासून तुम्हाला दूर राहावे लागेल.
तूळ
आजचा दिवस संपत्तीला प्रोत्साहन देणारा असणार आहे. छोटा प्रवास आज करावा लागू शकतो. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवाल. कामाच्या ठिकाणी थोडा ताप होईल. जर कोणत्या अडचणी येत असतील तर विशेष काळजी घ्याल.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांनी विचारकरुन निर्णय घ्यावेत. कामाच्या ठिकाणी थोडा कठीण काळ असू शकतो. तुमच्या मनातील भावना समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. शारीरिक समस्यांना सामोरं जावं लागेल.
धनु
आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहणार आहे. तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्ता वारसाहक्काने मिळू शकते. कामाच्या ठिकाणी काही अडचणींमुळे तुमचे मन अस्वस्थ होईल.
मकर
आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल राहणार आहे. तुमचे विरोधक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. तुम्हाला एखाद्या निर्णयाचा पश्चाताप होऊ शकतो. कुटुंबातील एखाद्या सदस्याला नवीन नोकरी मिळाल्याने वातावरण आनंददायी असेल.
कुंभ
आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम घेऊन येणार आहे. तुम्हाला कठोर परिश्रम आणि समर्पणाने काम करावे लागेल. तुमच्या कामात कोणतेही बदल तुम्ही खूप विचारपूर्वक केले पाहिजेत. प्रेम आणि सहकार्याची भावना तुमच्या मनात राहील.
मीन
आजचा दिवस तुमच्यासाठी आत्मविश्वासाने भरलेला असणार आहे. तुम्हाला समाजात चांगले नाव कमावण्याची संधी मिळेल, परंतु तुमची प्रगती पाहून तुमचे विरोधकही वाढू शकतात. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)