नवी दिल्ली : चीनची दुहेरी चाल पुन्हा एकदा समोर आलीय. एकीकडे चीन नव्या सरकारशी मैत्रीचा हात पुढे करतंय तर दुसरीकडे ड्रॅगननं अरुणाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरचा एक मोठा हिस्सा आपल्या नकाशामध्ये दाखवलाय.
गेल्या अनेक वर्षांपासून अरुणाचल प्रदेशवर चीन हक्क सांगतोय. मात्र आता जम्मू काश्मीरही चीननं आपल्या नकाशात दाखवतो. सध्या भारताचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी चीनच्या दौ-यावर आहेत. हीच संधी साधत ड्रॅगनने भारताची कुरापत काढलीये.
चीनच्या या दुहेरी भूमिकेमुळे भारत-चीन संबंधावर परिणाम होण्याची शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. चीन पुन्हा एकदा खुरापती काढण्याची व्युहरचना केल्याचे म्हटले जात आहे. तर 24 जून रोजी हायस्पीड बोटी वापरून लडाखमधील पंगोंग खोऱ्यात पाच किमी आत घुसखोरी केल्याचे उघड झाले. चीनचे सैनिक तब्बल दोन तास भारतीय हद्दीक घुसले होते. त्यामुळे चीनचा खरा डाव पुढे येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.