भारतात 14 लाख चिमुरडे शिक्षणापासून वंचित

भारताचा विकास झपाट्यानं होत असल्याचे विविध आकडे सांगत असले तरी देशातील मूलभूत समस्या मात्र कायम असल्याचंच संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालानं समोर आणलंय.

Updated: Jun 28, 2014, 01:47 PM IST
भारतात 14 लाख चिमुरडे शिक्षणापासून वंचित title=

नवी दिल्ली : भारताचा विकास झपाट्यानं होत असल्याचे विविध आकडे सांगत असले तरी देशातील मूलभूत समस्या मात्र कायम असल्याचंच संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालानं समोर आणलंय.

अन्न, पाणी या मूलभूत सुविधेंसोबतच सध्याच्या परिस्थितीत शिक्षण महत्त्वाचं झालंय. शिक्षणाचं महत्त्व भारताच्या कानाकोपऱ्यात पोहचली असलं तरी सुविधा मात्र पोहचलेल्या नाहीत. त्यामुळेच भारतात आजघडीला जवळपास 14 लाख विद्यार्थी शिक्षणापासून वंचित असल्याचं दिसतंय. 

घरची हलाखीची परिस्थिती किंवा इतर अशा अनेक कारणांमुळे हे विद्यार्थी शाळेत जाऊ शकलेले नाहीत... शाळेत दाखला मिळाला तरी त्यांना शिक्षण अर्धवटच सोडून काहीतरी कामधंदा करून आपलं पोट भरावं लागतं.  

भारतासोबतच इतर काही देशांतील शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांची आकडेवारी संयुक्त राष्ट्रानं जाहीर केलीय. पाकिस्तानात 50 लाखांपेक्षा जास्त तर इंडोनेशियामध्ये 10 लाखांपेक्षा जास्त मुलं शाळेत जाऊ शकलेली नाहीत. 
संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (युनेस्को)च्या अहवालानुसार, संपूर्ण जगात सहा ते 11 वर्षांतल्या अशिक्षित मुलांची संख्या 5.8 कोटी एवढी असून 2007 पासून या परिस्थितीत फारसा फरक पडलेला दिसून येत नाही. 

अहवालाच्या माहितीनुसार, 2011 साली भारतात 14 लाख विदयार्थी शिक्षणापासून वंचित होते. शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या घटत चालल्याची चित्रं ज्या देशांमध्ये दिसून आलं त्या 17 देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. ‘यूनेस्को’चे महासंचालक इरिना बोकोवा यांच्या म्हणण्यानुसार, शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी करण्यासाठी जेवढे प्रयत्न व्हायला हवेत, तेवढे दिसत नाहीत. त्यामुळे, 2015 पर्यंत सार्वभौमिक रुपात प्राथमिक शिक्षणाचं टार्गेट गाठणं कठिणचं आहे. 
 
पाकिस्तानमध्ये 2012 ला 54 लाख तर इंडोनेशियामध्ये 13 लाख मुलं शिक्षणापासून दूर होती. अशिक्षित मुलांची संख्या आफ्रिकेत सर्वांत जास्त आहे. इथं तर 12 ते 15 वर्षांच्या मुलांनी अजूनही शाळेचा चेहराही पाहिलेला नाही. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.