नरेंद्र मोदी थेट बराक ओबामांशी बोलू शकणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबमा यांच्या दरम्यान हॉटलाईन सुरू झाली आहे. ओबामांचे दक्षिण आशियाविषय विशेष सहाय्यक पीटर लेव्हॉय यांनी ही माहिती दिली.

PTI | Updated: Aug 22, 2015, 10:26 AM IST
नरेंद्र मोदी थेट बराक ओबामांशी बोलू शकणार title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबमा यांच्या दरम्यान हॉटलाईन सुरू झाली आहे. ओबामांचे दक्षिण आशियाविषय विशेष सहाय्यक पीटर लेव्हॉय यांनी ही माहिती दिली.

ओबामा २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून दिल्लीला आले असताना या हॉटलाईनचा निर्णय झाला होता. त्यानुसार ही हॉटलाईन सेवा सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत रशिया, ब्रिटन आणि चीन या देशांबरोबर अमेरिकचा हॉटलाईन संपर्क होता. आता भारताबरोबर राहणार आहे.

ओबमाम आणि मोदींना आंतरराष्ट्रीय धोरणांवर त्वरीत आणि सुरक्षित संपर्क साधता यावा, हा या हॉटलाईन मागचा हेतू आहे. हॉटलाईन कार्यान्वित झाली असली, तरी अद्याप तिचा वापर एकदाही झाला नसल्याचं लेव्हॉय यांनी स्पष्ट केलंय

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.