नवी दिल्ली : भारतीय वंशाचा आयएसचा दहशतवादी सिद्धार्थ धर याला आपल्या कारनाम्यांमुळे दहशतवादी संघटनेचा सीनिअर कमांडर बनवण्यात आलंय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक डॉक्युमेंट्रीमध्ये आयएसच्या तावडीतून सुटलेल्या निहद बरकत नावाच्या एका यजिदी तरुणीनं हा दावा केलाय. निहदच्या माहितीनुसार, सिद्धार्थचा त्या फॉरेन फायटर्सपैंकी एक आहे, ज्यांनी तिला सेक्स स्लेव्ह बनण्यासाठी भाग पाडलं.
ब्रिटनमध्ये राहणाऱ्या या दहशतवाद्याला आयएसचा नवा 'जिहादी जॉन' म्हटलं जातंय. मूळ भारतीय असलेला सिद्धार्थ धर इराकच्या मोसुल शहरात आयएसचा सिनियर कमांडर आहे. मोसूलवर आयएसचा मोठा प्रभाव आहे.
निहदच्या माहितीनुसार, सिद्धार्थच्या ताब्यात अनेक सेक्स स्लेव्ह आहेत... आणि या सर्व यजिदी महिला आहेत. लंडनमध्ये राहणाऱ्या सिद्धार्थला आयएसनं मोहम्मद एमवाजी याची जागा दिलीय. अमेरिकेनं केलेल्या ड्रोन हल्ल्यात एमवाजी याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर विदेशी नागरिकांची मुंडकी धडापासून वेगळी करण्याची जबाबदारी सिद्धार्थवर सोपवण्यात आलीय.
सिद्धार्थनं १० वर्षांपूर्वी इस्लाम धर्माचा स्विकार केला होता. त्याचं आत्ताचं नाव आहे अबू रुमायश... तेव्हापासूनच तो दहशतवादी कारवायांमध्ये सामील झालाय... पण, याची भनक मात्र त्याच्या कुटुंबियांनाही लागली नव्हती. २०१४ मध्ये सिद्धार्थ पत्नी आणि मुलांसहीत आयएसमध्ये सहभागी होण्यासाठी सीरियात निघून गेला. सिद्धार्थची बहिण कोनिका धर हिला मात्र अजूनही विश्वास बसत नाहीय की तिचा भाऊ आयएसमध्ये सहभागी झालाय.