वॉशिंग्टन : अतिरेकी हल्ल्यांनी जगभरात दहशत पसरवत असलेल्या इसिस या दहशतवादी संघटनेने गुरुवारी आणखी एक नवा व्हिडीओ प्रसिद्ध केला. या व्हिडीओमध्ये अमेरिकेतील व्हाईट हाऊसवर हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. मध्य पूर्व भागातील मीडिया रिसर्च संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 'पॅरिस बिफोर रोम' या नावाचा सहा मिनिटांचा व्हिडीओ इसिसने प्रसिद्ध केला आहे.
आणखी वाचा - रशियाचं विमान कसं उडवलं, इसिसनं केलं प्रसिद्ध
या व्हिडीओमध्ये इसिसचा एक दहशतवादी फ्रान्स येथील स्मारके तसेच व्हाईट हाऊसवर हल्ला करण्याची धमकी देत असल्याचे दिसत आहे. यासोबत पॅरिसमध्ये पुन्हा हल्ला करण्याचीही धमकीही या दहशतवाद्याने दिली आहे.
'आम्ही तुमच्यापासून सुरुवात केली आणि व्हाईट हाऊसवरील हल्ल्यानंतर याचा शेवट केला जाईल. ज्याप्रमाणे आम्ही येथील स्मारके उडवली आहेत त्याप्रमाणे व्हाईट हाऊसला उडवून देऊ.' व्हिडीओमध्ये अन्य दहशतवाद्यांनीही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकोईस होलांदे यांना धमक्या दिल्या आहेत. आत्मघाती पट्टे आणि कार बॉम्बच्या सहाय्याने आम्ही तुम्हाला उडवून देऊ. तुम्ही जिथे जाल तेथे आम्ही तुमचा पाठलाग करु, असे व्हिडीओत म्हटले आहे.
आणखी वाचा - इसिसच्या खात्म्यासाठी रशिया-फ्रान्ससह संपूर्ण जग एकवटलं
इसिसच्या दहशवाद्यांकडून न्यूयॉर्क शहरावर हल्ला करण्याचा व्हिडीओ प्रसिद्ध झाल्याच्या दुसऱ्या दिवशी हा नवा व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. बुधवारी न्यूयॉर्कवर हल्ला करण्याची धमकी देणारा व्हिडीओ इसिसने प्रसिद्ध केला होता. यात आमचा पुढील निशाणा न्यूयॉर्क असेल, असे म्हटले होते. गेल्या आठवड्यात फ्रान्सची राजधानी पॅरिसवरील हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी वॉशिंग्टन येथे हल्ला करण्याची धमकी दिली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.