इसिसमध्ये भारतीय स्त्री-पुरुष केवळ सेक्स गुलाम

 आयएसच्या तावडीतून भारतात परतलेल्या अरीब मजीद यानं आता एक नवा खुलासा केलाय. 

Updated: May 21, 2015, 04:54 PM IST
इसिसमध्ये भारतीय स्त्री-पुरुष केवळ सेक्स गुलाम title=

नवी दिल्ली :  आयएसच्या तावडीतून भारतात परतलेल्या अरीब मजीद यानं आता एक नवा खुलासा केलाय. 

आरिबच्या म्हणण्यानुसार, आयएसआयएसआय म्हणजेच इसिसचे दहशतवादी भारतीयांना लढण्यासाठी योग्य समजत नाहीत. त्यामुळे, इथून या दहशतवादी संघटनेत भरती होण्यासाठी गेलेल्या स्त्रिया आणि पुरुषांचा वापर केवळ 'सेक्स गुलाम' म्हणूनच केला जातो. 

महिलांचा वापर तर केवळ सेक्स गुलाम म्हणून होतो... त्यांचा वापर केवळ दहशतवाद्यांच्या लैंगिक गरजा पूर्ण करण्यासाठी केला जातो. तसंच इसिसमध्ये केवळ अरब लोकांनाच युद्धासाठी 'लढवय्ये' मानलं जातं. तर इथे भारतीयांना दुय्यम दर्जाचं स्थान दिलं जातं... आणि हे लक्षात आल्यानंतर याच कारणास्तव आपण भारतात परतण्याचा निर्णय घेतला, असं अरीबनं म्हटलंय. 

'आयएस'मध्ये भरती होण्यासाठी गेलेला अरीब अचानक काही दिवसांनी भारतात परतला. त्याच्याविरुद्ध 'एनआयए'नं आठ हजार पानांचं चार्जशीट फाईल केलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.