जपानमध्ये सुरु होतंय पहिलं नग्न हॉटेल

Updated: Jun 15, 2016, 02:29 PM IST
जपानमध्ये सुरु होतंय पहिलं नग्न हॉटेल title=

टोकियो - जपानमध्ये लवकरच नग्न हॉटेल सुरु होणार आहे. पण यामध्ये लठ्ठ लोकांना आणि अंगावर टॅटू गोंदलेल्या लोकांना प्रवेश नसणार आहे. या हॉटेलमध्ये नग्न भोजनाचा आनंद घेता येणार आहे. जपानमध्ये अमृता या नावाने हे हॉटेल सुरु होणार आहे.

टोकियोमध्ये येत्या २९ जुलैला या रेस्टॉरंटचे उद्घाटन होणार आहे. हॉटेलमध्ये प्रवेशासाठी ९० ते ५२० पौंड एवढी किंमत मोजावी लागणार आहे. यामध्ये खाद्यपदार्थ आणि नृत्याच्या कार्यक्रमाच्या आस्वाद घेता येणार आहे. हॉटेल सुरू होण्यापूर्वीच बुकींगला सुरुवात झाली आहे.

उंचीच्या तुलनेत जर १५ किलो अधिक वजन असेल तर बुकींग करता येणार नाही आहे. हॉटेलमध्ये कुणालाही स्पर्श करण्यास मनाई आहे. तसे टॅटू काढलेल्या ग्राहकांनाही या रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नसणार आहे. मोबाईल फोन आता घेवून जाता येणार नाही आहे. १८ ते ६० या वयोगटातील लोकांनाच या रेस्टॉरंटमध्ये प्रवेश आहे.