www.24taas.com, टोकियो
ईशान्य जपानला आज ७.३ रिश्टर स्केलच्या भूंकपाने जोरदार तडाखा दिला. या भूकंपानंतर जपानमध्ये १ मीटर लांबीच्या त्सुनामी लाटा समुद्रकिनारी धडकल्या मात्र, या कोणत्याही प्रकरची जिवितहानी झाली नाही.
भूकंपाचा केंद्रबिंदू कामियाशी समुद्र किनाऱ्यापासून ३०० किलोमीटर दूर खोल समुद्रात ३३ किलोमीटरवर असल्याचे अमेरिकन भूगर्भ शास्त्रज्ञांनी सांगितले.
भूकंपाचे धक्के राजधानी टोकियोतही जाणवले. मियागी येथे त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. याच ठिकाणी मार्च २०११मध्ये त्सुनामीने हाहाकार माजवला होता.
या भूकंपाने टोकियो तसेच जवळच्या मियागी भागातील अनेक इमारती थरारल्याची दृष्ये स्थानिक वृत्तवाहिन्या दाखवत आहेत. अनेक लोक घाबरुन रस्त्यावर तसेच मोकळ्या जागांमध्ये उतरले आहेत. अजूनही आफ्टरशॉक्समुळे घबराटीचे वातावरण आहे. लोकांना आधीच्या त्सुनामीचा हाहाकार माहीती असल्याने त्यांची गाळणच उडाली आहे.