'मैत्री'चा हात हातात घेऊन सौदी अरबसाठी ओबामा रवाना

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बरात ओबामा आपला तीन दिवसांचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर मंगळवारी दुपारी पालम एअरपोर्टहून सौदी अरबसाठी रवाना झालेत.

Updated: Jan 27, 2015, 04:30 PM IST
'मैत्री'चा हात हातात घेऊन सौदी अरबसाठी ओबामा रवाना title=

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बरात ओबामा आपला तीन दिवसांचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर मंगळवारी दुपारी पालम एअरपोर्टहून सौदी अरबसाठी रवाना झालेत.

ओबामा नवी दिल्लीहून सरळ सौदी अरेबियात दाखल होणार आहेत. गेल्या गुरुवारी सौदी अरबियाचे राजे अब्दुल्ली यांचं निधन झालं होतं. ओबामा आज आपल्या लिमोजिन 'बीस्ट'मध्ये बसून पालम एअरपोर्टवर दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी मिशेल ओबामा यादेखील उपस्थित होत्या. 

आड दुपारी 1.50 वाजता आपल्या अधिकृत विमान एअरफोर्स वनमध्ये जाण्याअगोदर ओबामांनी आपल्या पत्नीसोबत हात जोडून सर्वांना नमस्कार केला. ओबामा पालम पोहचण्यापूर्वी एअरपोर्टपर्यंतचा रस्ता सामान्य लोकांसाठी बंद करण्यात आला होता. सोबतच, या रस्त्यावर संपूर्ण सुरक्षा तैनात करण्यात आली होती. 

व्हाईट हाऊसनंही आपल्या अधिकृत वेबसाईटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनतेला ओबामांच्या शानदार दौऱ्यासाठी धन्यवाद दिलेत. उल्लेखनीय म्हणजे, बराक ओबामा रविवारी पालम एअरपोर्टवर दाखल झाले होते तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचं भव्य स्वागत केलं होतं. ओबामा हे पहिलेच अमेरिकन राष्ट्रपती आहेत जे भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.