पॉप स्टार लेडी गागाचा धक्कादायक खुलासा

प्रसिद्ध पॉप स्टार लेडी गागाने एक धक्कादायक खुलासा केलाय. १९व्या वर्षीही मीही बलात्काराची शिकार ठरले होते. हा अनुभव खरंच भयानक होता, असे लेडी गागाने म्हटले.

Updated: Dec 14, 2015, 12:30 PM IST
पॉप स्टार लेडी गागाचा धक्कादायक खुलासा title=

लंडन : प्रसिद्ध पॉप स्टार लेडी गागाने एक धक्कादायक खुलासा केलाय. १९व्या वर्षीही मीही बलात्काराची शिकार ठरले होते. हा अनुभव खरंच भयानक होता, असे लेडी गागाने म्हटले.

मी सात वर्षांपर्यंत ही गोष्ट कोणाला सांगितली नाही. कारण मला माहीत होते या गोष्टीबाबत समाज काय विचार करतो, याला कसे स्वीकारणार. यासाठी मी स्वत:ला दोष देऊ अथवा नको देऊ हे ही मला तेव्हा कळत नव्हते. या घटनेने माझे आयुष्य बदलून गेले. माझे विचार बदलले असे, २९ वर्षीय गागाने सांगितले.

या घटनेत आपली चूक नव्हती हे कळायला आपल्याला एक वर्ष लागला, असेही गागाने यावेळी नमूद केले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.