या महाशयांना सरकारी खर्चावर सातव्यांदा बोहल्यावर चढायचंय!

एका ७२ वर्षीय राष्ट्रपती महोदयांना लग्न करायचंय... होय पुन्हा एकदा... म्हणजेच सातव्यांदा... आणि महत्त्वाचं म्हणजे, राष्ट्रपतींच्या पत्नींचा सगळा खर्च हा सरकारी खजिन्यातून होतो. 

Updated: Dec 25, 2014, 10:22 AM IST
या महाशयांना सरकारी खर्चावर सातव्यांदा बोहल्यावर चढायचंय! title=

जोहान्सबर्ग : एका ७२ वर्षीय राष्ट्रपती महोदयांना लग्न करायचंय... होय पुन्हा एकदा... म्हणजेच सातव्यांदा... आणि महत्त्वाचं म्हणजे, राष्ट्रपतींच्या पत्नींचा सगळा खर्च हा सरकारी खजिन्यातून होतो. 

सातव्यांदा बोहल्यावर चढण्याची इच्छा आहे दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती जॅकब जुमा यांची...  या राष्ट्रपती महोदयांच्या दोन पत्नींचं याअगोदरच निधन झालंय. इतर चार पत्निंचा सगळा खर्च सरकारी खजिन्यातून पार पडतो... जॅकब जुमा यांना तब्बल २० अपत्यंही आहेत. 

डरबनचं उपनगर असलेल्या क्वाजुलु-नटालच्या दौऱ्यावर असलेल्या जॅकब यांनी इथं आपली सातव्यांदा आणि शेवटचं लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवलीय. 

'द स्टार' या वर्तमानपत्रानं दिलेल्या बातमीनुसार, जॅकब यांनी एका जाहीर सभेत आपली इच्छा व्यक्त केली... यानंतर उपस्थितांमध्ये एकच हास्यकल्लोळ उडाला. या सभेत अनेक वयस्कर व्यक्ती उपस्थित होते. गेल्या जून महिन्यात बराच काळ हॉस्पीटलमध्ये काढल्यानंतर आता आपण एकदम फिट अॅन्ड फाईन असल्याचं राष्ट्रपती जॅकब सांगतायत. 

उल्लेखनीय म्हणजे, जुलु लोकांच्या मान्यतेनुसार ज्या व्यक्तीच्या एकाहून अधिक पत्नी असतील तो आयुष्याच्या शेवटच्या वर्षांत आपल्या शेवटच्या पत्नीसोबत अधिकाधिक वेळ व्यतीत करतो. अनेक वेळा, व्यक्तीची शेवटची पत्नी म्हणजे त्या व्यक्तीच्या अगोदरच्या पत्नींच्या छोट्या बहिणी असतात.

'शेवटची पत्नी' ही प्रथा इथं यासाठी रुढ झालीय कारण, पत्नी तरुण असेल तर व्यक्तीच्या म्हातारपणाच्या काळात ती त्याची चांगली देखभाल करू शकते. राष्ट्रपती जॅकब यांनाही अशीच इच्छा आहे. 

पण, राष्ट्रपतींच्या या वाढीव इच्छांचा भार मात्र इथल्या नागरिकांना उचलावा लागतोय. कारण, त्यांच्या सर्व पत्नींचा सगळा खर्च सरकारी खजिन्यातून पार पडतो... म्हणजेच कर भरणारे नागरिक हा खर्च उचलतात... आणि त्यामुळेच, त्यांच्यावर चांगलीच टीकाही होतेय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.