www.24taas.com झी मीडिया, टोकीयो
आता येणार चालकरहीत टॅक्सी... आश्चर्यचकीत करणारी ही चालकरहित रोबो टॅक्सी आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर असणारी गुगल कंपनी अशी टॅक्सी विकसीत करणार आहे. या टॅक्सीमुळे अपघाताची संख्या कमी होईल आणि पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून त्याच्या फायदा होणार आहे, हा मुळ हेतू लक्षात घेऊन गुगल कंपनी ही टॅक्सी तयार करणार आहे.
गुगल कंपनीची चालकरहित रोबोट टॅक्सी ही प्रवाशांच्या गरजेनुसार ने-आण सेवा उपलब्ध करून देणार आहे. याचा आणखी एक फायदा असा होणार आहे, की लोक मोटार खरेदी करणार नाहीत. पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून त्याचा फायदा होणार तर आहेच पण याबरोबर अपघाताचे प्रमाण कमी होणार असल्याचे ‘द टाइम्स’ ने सांगितले आहे.
रोबोट टॅक्सी तयार करण्यासंदर्भात गुगल कंपनीने काही मोटार उत्पादन करणाऱ्या कंपन्यांशी चर्चा सुरू केली आहे. या कंपनीने पहिल्यांदाच चालकरहित टॅक्सीसाठी लागणारे सॉफ्टवेअर तयार केले आहे. हे सॉफ्टवेअर ते मोटार उत्पादकांना देणार होते. मोटार उत्पादक या सॉफ्टवेअरचा वापर करून अनुकूल अशी मोटार तयार करतील असे गुगल कंपनीला अपेक्षित होते. पण काही मोटार कंपन्यांनी गुगल कंपनीशी हात मिळवणी करण्यासाठी नकार दिला. कारण यामुळे गुगल कंपनी उत्पादन क्षेत्रात प्रवेश करण्यास सुरुवात करेल, अशी भिती मोटार कंप्यांना वाटते. त्यामुळे आता गुगल कंपनीने स्वतः मोटार उत्पादन करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘फ्रँकफर्टर अलगेमाइन झेटुंग’ या जर्मन वृत्तपत्रानुसार, गुगलने चालकरहित मोटारी तयार करताना ‘कॉन्टिनेंटल’ या मोटारींचे सुटे भाग तयार करणाऱ्या कंपनीची मदत घेण्याचे ठरवले आहे.
गुगल कंपनीने याआधी ‘ग्लास’ नावाचे उच्चतंत्राधिष्ठित चष्मे तयार केले आहेत. या चष्माचा फायदा असा की, हा चष्मा थेट डोळ्यापर्यत माहिती पोहोचवतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.