www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन
अमेरिकेत एक चोर अत्यंत वेगळ्या अनोख्या पद्धतीने पकडला गेला. चोराने पीडितालाच फेसबूकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवले, पीडित व्यक्तीने चोराचे फोटो पाहिले आणि त्याच्या शरीराचा एक खास भाग पाहून त्याला ओळखले. त्यामुळे चोर जेलमध्ये गेला.
मुलिन्स नावाचा हा २८ वर्षांचा व्यक्तीवर एका महिलेची पर्स चोरल्याचा आरोप होता. मुलिन्सने एक फेरी टर्मिनलमध्ये महिलेची पर्स आणि आयपॉड चोरी केला. या चोरीनंतर मुलिन्स फेसबूकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून महिलेला मित्र बनविण्याच्या प्रयत्नात होता. पण हीच चूक मुलिन्सला महागात पडली.
पीडित महिलेने फेसबूकवर मुलिन्सचे फोटो पाहून हैराण झाली. मुलिन्सचा हातावर टॅटू बनवला होता. मुलिन्सने आपल्या हातावर खास त्रिकोणी टॅटू बनविला होता. या टॅटूला पाहून महिलेला लगेच लक्षात आले की मुलिन्सच तो व्यक्ती आहे. ज्याने तिच्या सोबत गैरव्यवहार केला होता आणि तिला लूटले होते.
महिलनेत लगेत स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला. सध्या पोलिसांनी मुलिन्सला अट केली आहे. विशेष म्हणजे चोरीनंतर फेसबूकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठविण्याची घटना यापूर्वीही झाली आहे. मागील वर्षी मुंबईतील वाशीत राहणाऱ्या एका वयस्कर जोडप्याला आणि त्यांच्या मुलीला अशीच रिक्वेस्ट पाठवली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.