जगातील ५ सर्वात महागातील फळं

सध्या महागाईचा भारतात भडका उडाला आहे. पण आज आम्ही तुम्हांला असे फळ सांगणार आहोत त्यांची किंमत पाहिली तर आपण खूप स्वस्तात फळं खातो असे वाटले. यातील काही फळ तुम्हांला आपल्याकडे मिळतात असे वाटले पण त्या ठिकाणी दुर्मिळ असल्याने त्यांची किंमत अधिक आहे. तसेच ती पिकवण्याची पद्धत वेगळी असल्यामुळे यांची किंमत अधिक आहे. 

Updated: Nov 4, 2015, 07:21 PM IST

मुंबई : सध्या महागाईचा भारतात भडका उडाला आहे. पण आज आम्ही तुम्हांला असे फळ सांगणार आहोत त्यांची किंमत पाहिली तर आपण खूप स्वस्तात फळं खातो असे वाटले. यातील काही फळ तुम्हांला आपल्याकडे मिळतात असे वाटले पण त्या ठिकाणी दुर्मिळ असल्याने त्यांची किंमत अधिक आहे. तसेच ती पिकवण्याची पद्धत वेगळी असल्यामुळे यांची किंमत अधिक आहे. 

ही पाच फळ पुढील प्रमाणे 

५) रुबी रॉमन द्राक्ष 
ही द्राक्ष फक्त प्रतिष्ठेसाठी घेतली जातात. एका द्राक्षाचे वजन सुमारे २० ग्रॅम असते. यात साखरेचे प्रमाण १८ टक्के असते. याचा कलर चेरी टॉमॅटोसारखा असतो. रुबी रॉमन द्राक्ष जपानमध्ये मिळतात. याच्या एका घडाची किंमत ५४०० डॉलर ते ६४०० डॉलरच्या दरम्यान असते. म्हणजे भारतीय चलनात याची किंमत ३ लाख २४ हजार ते ३ लाख ८४ हजाराच्या आसपास असते. 

দুনিয়ার সবচেয়ে দামী পাঁচটা ফল

४) एग ऑफ द सन (आंब्याचा प्रकार)
एग ऑफ द सन हा एक आंब्याचा प्रकार आहे. याची किंमत सुमारे ३००० डॉलर म्हणजे १ लाख ८० हजार रुपये डझन आहे. हा अत्यंत उच्च प्रतिचा आंबा असून त्याची चव आणि आकारामुळे याला जास्त किंमत दिली जाते. 

३) ड्युसेक काळं कलिंगड 
ड्युसेक काळं कलिंगड हे सुमारे ७ हजार ६८८ डॉलरला विकलं जातं. भारतीय चलनात यांची किंमत ४ लाख ६१ हजार २८० रुपये आहे. या कलिंगडलाला रेषा नसतात. हे कलिंगड ११ किलोपर्यंत मोठे असू शकते. जगातील सर्वात मोठे कलिंगड म्हणून हे प्रसिद्ध आहे. जून २००८ ला विक्रमी किंमत ६ लाख ३० हजार येनला विकले गेले होते. 

२) युबेरी मेलन 
युबेरी मेलन म्हणजे चिभुड उर्फ गुळभेली उर्फ डांगर हे देखील प्रतिष्ठेसाठी विकत घेतले जाणारे फळ आहे. हे फळ युबेरी, होकायडो येथे तयार केले जाते. हे पॅरिसला गिफ्ट म्हणूनही पाठविले जाते. सुमारे ३.७ किलोचे हे फळ १ लाख ६० हजार येना विकले जाते. 

१) कॉर्नवॉल इंग्लडचे अननस 

कॉर्नवॉल इंग्लडचे अननस हे सर्वात महागडे फळ आहे. सुमारे १० हजार पौंडला विकले गेले आहे. हे सर्वसामान्य अननसासाखरे दिसते पण त्याची उगविण्याची पद्धत खूप वेगळी आहे. हे फळ उगविण्यासाठी विशिष्ट वातावरण निर्माण केले जाते. सुमारे २ वर्ष हे फळ तयार होण्यास लागते. 

हा व्हिडिओ पाहाच..

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.