www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भारतीय राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांच्याविरोधात अमेरिकेत अटक वॉरंट बजावण्यात आलंय. व्हिसामध्ये घोळप्रकरणी मॅनहॅटन कोर्टाने देवयानी यांना दोषी ठरवलंय.
`पीटीआय` या वृत्तसंस्थेनं याबाबतचं वृत्त दिलंय. मोलकरणीची पिळवणूक केल्याच्या आरोपातून मुक्तता होत नाही, तोवर हा निर्णय आलाय. मॅनहॅटन कोर्टात देवयानी यांच्याविरोधात नव्याने २१ पानी आरोपपत्र दाखल करण्यात आलं. दोन गुन्ह्यांमध्ये देवयानी दोषी आढल्याचं कोर्टाने म्हटलंय.
देवयानी यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाला आपल्या मोलकरणीची चुकीची आणि बनावट माहिती दिल्याचा आरोप करण्यात आलाय. खरी माहिती दिली असती तर मोलकरणीला व्हिसा मिळाला नसता, हे त्यांना माहीत होतं... त्याचप्रमाणे अमेरिकेच्या कायद्यानुसार मोलकरणीला पगार देण्यास तयार नव्हत्या. यासोबतच मोलकरीण संगीत रिचर्ड हिची पिळवणूक केल्याचाही आरोप देवयानी खोब्रागडे यांच्यावर ठेवण्यात आलाय. त्यामुळं त्यांना आरोपातून मुक्त करण्याचा आधीचा निर्णयही रद्द करण्यात आलाय.
देवयानी खोब्रागडे सध्या भारतात आहेत... जर आणि जेव्हा देवयानी यांना अटक करण्यात येईल, त्यावेळी न्यायालयाला सूचित करण्याचे आदेशही देण्यात आलेत. न्यायालयाला सूचित केल्यानंतर देवयानीला कोर्टात हजर करण्याची वेळ देता येईल.
अमेरिकेतल्या मोलकरणीच्या पिळवणूक प्रकरणानंतर देवयानी यांची भारतातबदली करण्यात आलीय. सध्या त्या भारतात असल्या तरी त्यांचं कुटुंब मात्र अमेरिकेतच आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.