www.24taas.com, वृत्तसंस्था, क्वॉलालंपूर
बेपत्ता विमानाचा अद्याप शोध लागलेला नाही. मात्र, मलेशियन एअरलाईन एमएच ३७० हा फ्लाईट कोड मलेशियन एअरलाईन्सनं रद्द केलाय. क्वॉलालंपूर ते बिजिंग या हवाईमार्गासाठी आता नवा कोड देण्यात येणार आहे.
बेपत्ता झालेल्या मलेशियन एअरलाईनच्या एमएच ३७० ह्या फ्लाईटचं नेमकं झालं तरी काय या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही..शनिवारी ८ मार्चला या मलेशियन एअरलाईन्सच्या या विमानानं रात्री बारा वाजून २१ मिनिटांनी क्वालालंपूरहून उड्डाण केलं..ते चीनमधील बीजिंगला सकाळी साडेसहा वाजता पोहोचणार होतं...या विमानात २२७ प्रवाशी आणि १२ विमान कर्मचारी होते. पण उड्डाण केल्य़ानंतर एक-दोन तासातच व्हिएतनामजवळ या विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. त्यानंतर या विमानाचं काय झालं हे एक मोठं गूढच बनलं आहे.
या विमानाच्या शोधासाठी मोठी शोधमोहिम हाती घेण्यात आली आहे . या शोधाची व्यापी आता अंदमानपर्यंत वाढवण्यात आली आहे. भारतीय नौदलाची जहाजे आणि विमाने यांनीही या शोधमोहिमेत सहभाग घेतलाय. बेपत्ता झालेलं विमान रडारहून गायब झाल्यानंतरही चार तास हवेत उडत होतं, असं वृत्त वॉल स्ट्रिट जर्नल या वृत्तपत्रानं दिलं होतं. पण मलेशियन सरकारनं याबाबत काहीही माहिती नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.