लंडन: दक्षिण-पूर्व इंग्लंडच्या ससेक्समध्ये शनिवारी एका एअर शो दरम्यान स्टंट दाखवणारं एक विंटेज प्लेन हायवेवर क्रॅश झालं. अपघातात हायवेवरील काही कार सापडली. यात एकूण सात जणांचा मृत्यू झाला तर १४ जणं जखमी झालेत. घटनेच्यावेळी शेकडो प्रेक्षक तिथं उपस्थित होते.
पायलट बचावला
घटना शोरेहॉम एअर शोदरम्यान झाली. १९५०चं हॉकर हंटर जेट पहिले खूप उंचावर गेलं. नंतर असंतुलनामुळं खाली आलं आणि जमिनीवर आदळलं. आजूबाजूच्या परिसरात आगचआग पसरली आणि धुरांडे उडायला लागले. अपघातात विमानाचा पायलट अँडी हिल बचावला. त्यांना जळत्या मलब्यातून बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात आलं. हिल ब्रिटिश एअरवेजचे पायलट असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं कळतंय.
लग्नाची गाडीही अपघातग्रस्त
हायवेवरील ज्या कार अपघातग्रस्त झाली त्यात लग्नासाठी तयार करण्यात आलेली एक सजवलेली कार होती. ही कार नवरीला आणण्यासाठी निघाली होती. विमानाचं एव्हिएशन फ्यूएल जवळील कारवर पडलं. त्यामुळं त्यांनाही आग लागली.
अनुभवी पायलट
अपघातग्रस्त जेटचे पायलट अँड्री हिल खूप अनुभवी होते. ५० वर्षीय हिल यांना १२ हजार तासांहून अधिक विमानप्रवासाचा अनुभव आहे. त्यांची पत्नीही खूप अनुभवी पायलट आहे.
पाहा हा अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.