मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेत्री साधना यांना मुंबईतील एका दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. साधना या काही काळापासून माऊथ कॅंसरच्या पेशंट असल्याचे कळते. या संदर्भात केलेल्या सर्जरी नंतरच त्यांची तब्येत आणखीन खालावल्याचे कळते.
याच आठवड्यात केजे सोम्मया मेडिकल कॉलेज कॅम्पसच्या एशियन इन्स्टिट्यूट ऑफ ऑन्कोलॉजीमध्ये त्यांच्यावर माऊथ सर्जरी झाली. सुत्रांकडून समझते की ही सर्जरी जवळ जवळ ९ तास चालली होती.
साधना यांनी जुन्या जमान्यात ‘मेरा साया’ 'आरजू', 'मेरे मेहबूब', 'लव इन शिमला' आणि 'वो कौन थी' यांसारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांना आपल्या दिलखेच अभिनयाने वेड लावले होते. ७३ वर्षांच्या साधना याचवर्षी मे महिन्यात अभिनेता रणबीर कपूर सोबत रॅम्पवर दिसल्या होत्या. त्यांची प्रकृती सध्यातरी नाजूकच असल्याचे वृत्त हाती आले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.