ठाणे : अभिनेत्री सनी लिओन विरोधात डोंबिवलीत तक्रार दाखल झालीय. सनी लिओने तिच्या वेबसाईटच्या माध्यमातून अश्लिलता पसरवत असल्याची तक्रार नोंदवण्यात आलीय. त्या तक्रारीबाबत आपला जबाब नोंदवण्यासाठी आज सनी लिओन ठाणे आयुक्तालयात आली होती.
वेब साईटवर सनी लिओनचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ टाकण्यात आले आहेत. त्याविरोधात आक्षेप घेण्यात आलाय. आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. लोकांच्या भावना दुखावतील आणि त्याचा तरुणांवर वाईट परीणाम होईल, अशी तक्रार डोंबिवली मधील एका सामाजिक संस्थेने केली.
ही वेबसाईट बंद करावी आणि तात्काळ सनी लिऑनला अटक करावी अशी मागणी या सामाजिक संस्थेने केली आहे. त्यानुसार डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.