बंगाली अभिनेता रोनी चक्रवर्तीचा रहस्यमय मृत्यू

बंगालचा प्रसिद्ध टिव्ही अॅक्टर रोनी चक्रवर्ती मृतावस्थेत त्याच्या घरानजीकच्या तलावात सापडला. शुक्रवारी इस्टर्न मेट्रोपॉलिटन बाय पासमधून पोलिसांना त्याचा मृतदेह मिळाला होता. घटनास्थळावरुन रोनीची बाईक आणि मोबाईल पोलिसांनी हस्तगत केला आहे. 

Updated: May 16, 2015, 07:05 PM IST
बंगाली अभिनेता रोनी चक्रवर्तीचा रहस्यमय मृत्यू title=

कोलकाता: बंगालचा प्रसिद्ध टिव्ही अॅक्टर रोनी चक्रवर्ती मृतावस्थेत त्याच्या घरानजीकच्या तलावात सापडला. शुक्रवारी इस्टर्न मेट्रोपॉलिटन बाय पासमधून पोलिसांना त्याचा मृतदेह मिळाला होता. घटनास्थळावरुन रोनीची बाईक आणि मोबाईल पोलिसांनी हस्तगत केला आहे. 

रोनीच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार घरी परतल्यानंतर रोनी पुन्हा जिममध्ये गेला होता. त्यानंतर तो जवळीत तलावात पोहण्यासाठी गेला होता. रात्री उशिरापर्यंत रोनी घरी न परतल्याने त्याच्या घरच्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. 

पोलिसांना तपासादरम्यान रोनीचं प्रेत तलावात मिळालं. हॉस्पिटलमध्ये नेल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. रोनीचा मृत्यू हत्या आहे, आत्महत्या आहे की दुर्घटना? याचा तपास पोलीस करत आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.