" 'बॉम्बे व्हेल्व्हेट'च्या सेटवर रणबीर दारू पिऊन यायचा"

अभिनेता रणबीर कपूर 'बॉम्बे व्हेल्व्हेट' या चित्रपटाच्या  सेटवर टल्ली होऊन यायचा अशी माहिती समोर येत आहे, कारण, दारू पिऊन सेटवर येण्यासाठी रणबीरला अधिकृतरित्या परवानगी देण्यात आली होती, ही आश्चर्यजनक माहिती चित्रपटाचा दिग्दर्शक अनुराग कश्यपनेच काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीदरम्यान दिली. 

Updated: May 5, 2015, 10:43 AM IST
" 'बॉम्बे व्हेल्व्हेट'च्या सेटवर रणबीर दारू पिऊन यायचा" title=

मुंबई : अभिनेता रणबीर कपूर 'बॉम्बे व्हेल्व्हेट' या चित्रपटाच्या  सेटवर टल्ली होऊन यायचा अशी माहिती समोर येत आहे, कारण, दारू पिऊन सेटवर येण्यासाठी रणबीरला अधिकृतरित्या परवानगी देण्यात आली होती, ही आश्चर्यजनक माहिती चित्रपटाचा दिग्दर्शक अनुराग कश्यपनेच काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीदरम्यान दिली. 

मात्र रणबीर दाऊपिऊन सेटवर यायचा यामागील कारणंही तेवढंच गंमतशीर आहे. 'बॉम्बे व्हेल्व्हेट'मध्ये रणबीर आणि अनुष्का यांची अनेक भावोत्कट दृश्ये आहेत. पण काही केल्या ही दृश्ये चित्रीत करताना रणबीरकडून हवे तसे काम होत नव्हते. त्यामुळेच रणबीरने दारू पिऊन ही दृश्ये चित्रीत करावी, असा पर्याय सुचविण्यात आला. जेणेकरून, भावोत्कट प्रसंगाच्यावेळी कॅमेऱ्यासमोर रणबीरच्या चेहऱ्यावरील भाव आणि डोळ्यातील अश्रू खरे वाटावेत, असा दिग्दर्शकाचा प्रयत्न होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.