मुंबई : बॉलीवूडचा सुपरस्टार आमिर खानचे जगभरात चाहते आहेत. भारतात बॉक्स ऑफिसवर दंगल माजवणाऱ्या आमिरच्या सिनेमाचा चीनमध्ये डंका वाजतोय.
आमिरच्या दंगल सिनेमाने चीनमध्ये 72 कोटी रुपयांची कमाई केली. तरण आदर्श यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिलीये.
आमिरच्या या सिनेमाने हिंदी सिनेसृष्टीतही नवे इतिहास रचले होते. भारतीय कुस्तीपटू गीता आणि बबिता फोगट या भगिनींच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. आमिरने या सिनेमात महावीर फोगट यांची भूमिका केलीये.
#Dangal hits the ball out of the park... Collects a FANTABULOUS $ 11.30 million [₹ 72.68 cr] in its opening weekend in China... OUTSTANDING!
— taran adarsh (@taran_adarsh) May 7, 2017