दीपिकाने उघडलं सलमानच्या लग्नाचं गुपित

बॉलीवूडचे अनेक कलाकार कितीही काही झालं तरी सार्वजनिक ठिकाणी काहीही बोलणं टाळतात आणि जेव्हा सलमान खानच्या लग्नाचा विषय येतो त्यावर अनेक कलाकार तोंड बंद ठेवणे हाच पर्याय स्वीकारतात.

Updated: Dec 16, 2015, 06:22 PM IST
दीपिकाने उघडलं सलमानच्या लग्नाचं गुपित title=

मुंबई : बॉलीवूडचे अनेक कलाकार कितीही काही झालं तरी सार्वजनिक ठिकाणी काहीही बोलणं टाळतात आणि जेव्हा सलमान खानच्या लग्नाचा विषय येतो त्यावर अनेक कलाकार तोंड बंद ठेवणे हाच पर्याय स्वीकारतात.

सलमान खान आणि लूलिया वंतूर यांचं लग्न होणार असल्याची चर्चा तर सर्वत्र सुरू आहे पण दीपिका पदुकोण हिने एक असं वक्तव्य केलं ज्यामुळे चर्चा हे सत्यात उतरेल असं जवळपास निश्चित झालंय.

दीपिकाला जेव्हा असा प्रश्न विचारला गेला की 'तु सलमानला त्याच्या वाढदिवसाला काय गिफ्ट देणार आहे.'? त्यावर दीपिकाने 'मी सलमानला एक सुंदर पत्नी गिफ्ट करणार असल्याचं म्हटलं आहे.'