एक व्हिलन : रितेश देशमुखसाठी पाहा

एका सायको किलर भोवती फिरणारी एक व्हिलनची कथा आहे.. प्रत्येक सिनेमात जसा हिरो , हिरोइन आणि व्हिलन असतो अगदी त्याचं प्रमाणे एक व्हिलन ही फिल्म याच तीन पात्रांचीही स्टोरी आहे... यात रोमांस आहे, ढिशुम ढिशुम आहे, छान गाणी आहेत.. इन शॉर्ट हा एक टिपीकल.. कमर्शियल हिंदी सिनेमा आहे.

Updated: Jun 27, 2014, 07:17 PM IST
एक व्हिलन : रितेश देशमुखसाठी पाहा title=

जयंती वाघधरे, प्रतिनिधी, झी मीडिया : एका सायको किलर भोवती फिरणारी एक व्हिलनची कथा आहे.. प्रत्येक सिनेमात जसा हिरो , हिरोइन आणि व्हिलन असतो अगदी त्याचं प्रमाणे एक व्हिलन ही फिल्म याच तीन पात्रांचीही स्टोरी आहे... यात रोमांस आहे, ढिशुम ढिशुम आहे, छान गाणी आहेत.. इन शॉर्ट हा एक टिपीकल.. कमर्शियल हिंदी सिनेमा आहे.

कसं आहे दिग्दर्शन

मोहीत सूरीने एक व्हिलनचं दिग्दर्शिन केलंय..दिग्दर्शनाच्या पातळीवर त्याने या सिनेमात काही ठिकाणी नक्कीच वेगळे एक्सपेरिमेंट केले आहेत.. पण सिनेमाला देण्यात आलेली ट्रिटमेंट ही टिपीकल मोहीत सूरी स्टाइलचीच आहे.. या सिनेमातही त्यानं हिरोईन पेक्षा हिरोला जास्त महत्व दिलाय... आवारापन असो, मर्डर 2 असो, आशिकी2 असो मोहीतची सिनेमा हाताळची स्टाइल मात्र तीच.. त्यामुळे त्याच्या दिग्दर्शनामध्ये तोचतोपणा आढळून येतो.

सिद्धार्थ मल्होत्रा कसा वाटला

मोहीत सूरीच्या सिनेमातला हिरो म्हणजे रफ लुक्स, अटीट्यूट असणारा, कम्पलिट मॅचोमॅन, जो या सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रानं साकारलाय.. खरं तर मोहीत सूरीच्या प्रत्येक सिनेमांतला त्याचा हिरो कायम उठून दिसतो.. एक विलनमध्ये जो ख-रा अर्थानं हिरो ठरतो तो म्हणजे सिद्धार्थ मल्होत्रा. केवळ लुक्सच नाहीतर त्याने एक्टिंगही चांगली केलीय.. मात्र श्रद्धा कपुर बद्दल बोलायचं झालं तर या सिनेमात आशिकी -2चं एक्सटेन्शन पहायला मिळतं... हिरोला सांभाळून घेणारी हिराईन, त्याची काळजी घेणारी, त्याला जपणारी एक गोड, बबली, गर्ल नेस्ट डोअर असणारी मुलगी श्रद्धाने साकारलीय.. या सिनेमात श्रद्धाचा अभिनय फार काही ग्रेट नाही.

रितेश देशमुखचा नवा अंदाज

एक व्हिलनमधील आणखी एक महत्वाचं पात्र म्हणजे रितेश देशमुख ..रितेशचा एक नवा अंदाज या सिनेमात तुम्हाला आपल्याला पहायला मिळणार आहे. एक व्हिलनमधला व्हिलन रितेशनं साकारलाय... त्याच्या आजवरच्या कारकीर्दीतली ही एक अत्यंत वेगळी अशी व्यक्तीरेखा. संसाराच्या चक्रात अडकलेला राकेश महाडकर नावाचा एक मराठी मध्यम वर्गीय तरुण... रीतेशचा एक वेगळाच अंदाज यात पहायला मिळतो..एक्टिंगच्या विचार करता सिद्धार्थ आणि रितेश या दोघांनी आपआपल्या जागी ठिकठाक भूमिका बजावल्या आहे..

संगीत कसं आहे 

अंकीत तिवारी आणि मिथुन या दोघांनीही एक व्हिनच्या संगीताची धूरा सांभाळली आहे.. अत्यंत मधूर असं या सिनेमाचं संगीत आहे.. 'तेरी गलीयां' हे गाणं सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच पॉप्यूलर झालंय.. त्याच बरोबर बंजारा, झरुरत, हमदर्दही गाणीही हिट आहेत..

थोडक्यात

एक व्हिलनच्या फर्स्ट हाफमध्येच खरंतर सिनेमा संपतो.. सिनेमाचा पहिला भाग प्रेक्षकांना बांधून ठेवतो.. मात्र दुसरा भाग थोडासा स्लो आणि बोअरींग झाला आहे.... सिनेमातली सस्पेन्स हळूहळू दुस-या भागात गायब होत जातो.. ओव्हर ऑनल सेकंड हाफमध्ये हा सिनेमा फेल ठरतो... उगाचच ओढून ताणून घुसवलेल्या सीन्समुळे सिनेमा एका पॉइंटला बोर होतो.. प्राची देसाईनं सादर केलेल्या आयटम साँगची खरं तर गरजच नव्हती.. स्टोरी, दिग्दर्शन, एक्टिंग आणि म्युझिक हे सगळं पहाता आम्ही या सिनेमाला देतोय 3 स्टार्स..

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.