चेन्नई : अनेक जाहिराती आणि काही तमिळ चित्रपटात काम केलेले अभिनेते बालमुरली मोहन यांनी आपल्या राहत्या घरी मृत अवस्थेत आढळले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ५४ वर्षीय अभिनेत्याने पुरसावालकम येथे आपल्या घऱी फाशी घेऊन कथित आत्महत्या केली आहे.
अभिनेत्याच्या पत्नीने अनेकवेळा त्यांची रूम उघड्याचा प्रयत्न केला, पण रूम आतून बंद होती. रूम उघडली नाही म्हणून त्यांनी खिडकीतून पाहिले त्यावेळी बालमुरली फाशीच्या दोराला लटकलेले आढळले.
आतापर्यंत कोणतेही सुसाइड नोट मिळालेली नाही. पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहे. बालमुरली मोहन यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा आहे. मुलगा अमेरिकेत आहे. मोहन यांननी ब्वॉयज आणि अल्लिथंधा वानम चित्रपटात काम केले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.