चित्रपट : 'चॉक अॅण्ड डस्टर'
दिग्दर्शक : जयंत गिलातर
लेखन : राजीव वर्मा, नीतू वर्मा
कलाकार : जुही चावला, शबाना आझमी, झरीना वहाब, दिव्या दत्ता, उपासना सिंग
मुंबई : जो चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला तुमच्या शाळेतल्या एखाद्या शिक्षिकेची आठवण होईलच, असा चित्रपट म्हणजे 'चॉक अॅण्ड डस्टर'... बॉलिवूडमध्ये याआधीही शिक्षण व्यवस्थेविषयी चित्रपट आलेत... तरी 'चॉक अॅण्ड डस्टर' वेगळा ठरतो.
पण तरीही थिएटर मालक आणि सिनेमा जाणकारांनी याला फारसे महत्त्व दिल्याचं दिसत नाही. काहींच्या मते यातील कलाकारांबद्दल आता फारसे आकर्षण राहिलेले नाही.
चित्रपटात मुंबईच्या 'कांताबेन' नावाच्या एका शाळेची गोष्ट दाखवली आहे. अनमोल परिक शाळेचा ट्रस्टी असून त्याला आता अशी उत्तम शाळा सुरू करायची आहे जिथे श्रीमंत मुलं शिक्षण घेऊ शकतील. त्यासाठी तो शाळेतील मुख्याध्यापिका असलेल्या भारती शर्माला कामावरून काढून टाकतो आणि उपमुख्याध्यापिका असलेल्या कामिनी गुप्ताला (दिव्या दत्ता) नवी मुख्याध्यापिका बनवतो. कामिनी गुप्ता अनुभवी शिक्षकांना त्रास देऊ लागते. शाळेत गणित शिकवणाऱ्या विधा सावंत (शबाना आजमी) आणि विज्ञान शिकवणाऱ्या टीचर ज्योती (जूही चावला) याचा विेरोध करतात तर त्यांना कामिनी कामावरून काढून टाकलं जातं. हे ऐकताच विधाला शाळेत हार्ट अटॅक येतो आणि तिला हॉस्पिटलमध्ये नेलं जातं. अशातच ज्योती पत्रकार असणाऱ्या भैरवीला सोबत घेऊन शिक्षकांच्या सन्मानासाठी लढते.
जयंत गिलतरचं दिग्दर्शन कमाल आहे. चित्रपट कुठेही रटाळ होत नाही. शबाना आजमी, जुही चावला आणि दिव्या दत्ताचा अभिनय कमालीचा आहे. शेवटी ऋषी कपूरना पडद्यावर पाहणे पण एक वेगळा अनुभव आहे.
सिनेमाला संगीत दिलंय संदेश शांडिल्य यानं... चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला तुमच्या शाळेची आणि शिक्षकांची आठवण नक्कीच होईल.