फिल्म रिव्ह्यू : लढा 'मध्यमवर्गीयां'चा!

रवी किशन आणि सिद्धार्थ जाधव स्टारर ‘मध्यमवर्गीय’ ही कहाणी आहे एका मध्यमवर्गीय कुटुंबाची, त्यांच्या लढ्याची… 

Updated: Dec 13, 2014, 07:20 PM IST
फिल्म रिव्ह्यू : लढा 'मध्यमवर्गीयां'चा!

सिनेमा : मध्यमवर्गीय
दिग्दर्शक : हॅरी फर्नाडिस
सूत्रधार : वसंत आंजर्लेकर
कलाकार : रवीकिशन, सिद्धार्थ जाधव, नयना आपटे, अनंत जोग, कश्मिरा कुलकर्णी, हेमांगी काझ, किशोर नांदलस्कर, वसंत आजर्लेकर, रमेश वाणी, अनिल गवस, अॅलन फर्नाडिस, तन्वी मेहता 

रवी किशन आणि सिद्धार्थ जाधव स्टारर ‘मध्यमवर्गीय’ ही कहाणी आहे एका मध्यमवर्गीय कुटुंबाची, त्यांच्या लढ्याची… अभिनेता रवी किशननं साकारलेल्या आदर्श वागळेची ही कहाणी आहे... अन्यायाविरुद्धचा त्यांचा हा लढा यात अधोरेखीत करण्यात आलाय. धाडसी, प्रामाणीक, कर्तव्यनिष्ठ असा एक ‘मिडल क्लास’ पत्रकार आदर्श वागळे याची बहिण एका अत्यंत श्रीमंत घरातल्या मुलाच्या प्रेमात पडते. हा मुलगा म्हणजे विजय राउत... विजय राउतची व्यक्तिरेखा अभिनेता सिद्धार्थ जाधवनं यात साकारली आहे, जो पुढे जाउन एक प्रामाणिक पोलीस इन्स्पेक्टर बनतो. प्रत्रकार आदर्श वागळेच्या या लढ्यात हा इन्स्पेक्टर त्याची साथ तर देतो पण कायद्याच्या चौकटीत राहून... खरं हा सिनेमा एक परिपूर्ण कमर्शिअल  मसाला पट आहे.

अभिनय
आदर्श वागळे ही व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता रवी किशनचा पहिलाच सिनेमा आहे.  त्याच्या अभिनयाबद्दल सांगायचं झालं तर समतोल साधत त्यानं अभिनय केलाय. हा त्याचा पहिला मराठी सिनेमा असला तरी त्याचा परफॉर्मन्स उल्लेखनीय आहे. पण, डबिंगमध्ये बऱ्याच ठिकाणी चुका जाणवतात. पण एका भोजपुरी अभिनेत्याचा मराठीतला हा पहिलाच परफॉर्मन्स पाहता, या गोष्टी कदाचित दुर्लक्ष केल्या जातील... 
  
सिदार्थ जाधवनं साकारलेला इन्स्पेक्टर विजय राऊत त्याच्या नेहमीच्या भूमिकांपेक्षा नक्कीच वेगळा आहे. या सिनेमात अॅक्शन आणि जरा वेगळे स्टंट्स करताना तो दिसतो. एका इन्स्पेक्टरच्या लूकसाठी त्यानं खूप मेहनत घेतली आहे. त्याची ती मेहनत त्याच्या ‘मॅचो लूक’वरुन या सिनेमातून दिसून येते. सिद्धार्थचं कॅरेक्टर काही ठिकाणी थोडंसं कन्फ्युझ्ड जाणवतं. पण, या गोष्टीला खरंतर सिनेमाचा दिग्दर्शकच जबाबदार आहे. मध्यमवर्ग या सिनेमातला सिद्धूचा परफॉर्मन्स रॉकिंग होता यात काहीच शंका नाही.

दिग्दर्शन
हॅरी फर्नांडिसनं सिनेमा दिग्दर्शत केलाय. त्यानं त्याच्या नेहमीच्या जोनरप्रमाणे एक परिपूर्ण कमर्शिअल मसाला सिनेमा करण्याचा प्रयत्न केलाय... आणि यात तो बऱ्यापैंकी यशस्वीही झालाय. काही अपवाद वगळता सिनेमाची मांडणीही त्यांनं बरी केली आहे. या फिल्ममध्ये काही खटकतं ते म्हणजे यातल्या तांत्रिक चुका...  सिनेमाच्या चित्रीकरणाच्या वेळी दोन वेगवेगळे कॅमेरे वापरण्यात आलेत. हे त्याच्या क्वालिटीवरून जाणवतं.
 
शेवटी काय तर...
मध्यमवर्ग या सिनेमातल्या रवी किशन आणि सिद्धार्थ जाधवच्या कडक परफॉर्मन्ससाठी आम्ही या सिनेमाला देतेय तीन स्टार्स...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.