मुंबई : प्रोड्युसर विधू विनोद चोपडा हे संजय दत्तला घेऊन 'मुन्नाभाई - ३' बनवण्यात अजूनही गंभीर आहेत. सध्या संजूबाबा पुण्याच्या येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत असल्यामुळे त्यांचा हा प्रोजेक्ट रखडलाय... संजय दत्त सुटल्यानंतर का होईना, पण त्याच्याबरोबरच हा सिनेमा बनवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय.
यापूर्वी, विधू यांनी संजय दत्तसोबत 'मुन्नाभाई एमबीबीएस' आणि 'लगे रहो मुन्नाभाई' यांसारखे सुपरहिट सिनेमे प्रेक्षकांसमोर आणले होते.
याच मुन्नाभाईची सीरिजचा तिसरा सिनेमा बनणार किंवा नाही याबद्दल अजूनही शंका उपस्थित केली जात होती. पण, ही शंका विधू चोपडा यांनी धुडकावून लावलीय. आपण 'मुन्नाभाई ३' बनवणार आणि तोही संजय दत्तसोबतच, असं त्यांनी स्वत: स्पष्ट केलंय.
१९९३ सालच्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात हत्यारं बाळगल्याप्रकरणात दोषी ठरवला गेलेला संजय सध्या येरवडा तुरुंगात आपली शिक्षा पूर्ण करतोय. तो तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर लगेचच या सिनेमाची शूटींग सुरू होणार आहे.
संजय माझ्या खूप जवळचा आहे... तो खूपच सकारात्मक आहे. संजयनं मला तुरुंगातून एक पत्र पाठवलंय... यात त्यानं आपण जेलमध्ये राहून '८ पॅक अॅब्स' बनवल्याचं सांगितलंय. यासाठी, तो जेलमध्ये पाण्यानं भरलेल्या बादल्याही उचलतोय. तो तुरुंगातून बाहेर येताच या सिनेमाचं शूटींग आम्ही सुरू करणार आहोत, असं चोपडा यांनी स्पष्ट केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.