कतरिना म्हणते सलमानने ठेवलेले नाव मला नकोय...

गेल्या वर्षभरापर्यंत खूप गाजलेली अभिनेत्री म्हणजे कतरिना कैफ. अनेक चित्रपट येऊन गेले, प्रसिद्धी मिळाली. खूप चर्चा देखील झाली. जगभरातल्या चाहत्यांनी 'सेक्सिएस्ट वुमन'या किताबानं गौरवलं.  

Updated: Dec 12, 2014, 09:51 PM IST
कतरिना म्हणते सलमानने ठेवलेले नाव मला नकोय... title=

मुंबई : गेल्या वर्षभरापर्यंत खूप गाजलेली अभिनेत्री म्हणजे कतरिना कैफ. अनेक चित्रपट येऊन गेले, प्रसिद्धी मिळाली. खूप चर्चा देखील झाली. जगभरातल्या चाहत्यांनी 'सेक्सिएस्ट वुमन'या किताबानं गौरवलं.  

बॉलिवूडमध्ये आल्यानंतर कतरिनाची 'कॅट' केव्हा झाली हे कळलंच नाही; पण तिला स्वतःला हे नाव अजिबात आवडत नाही. असं स्वत: कतरिनानेच एका मुलाखतीत हे स्पष्टपणे व्यक्त केले आहे. पुलाखालून एवढं पाणी वाहून गेल्यावर तिला आत्ताच का या नावाची अॅलर्जी वाटू लागली आहे, असा प्रश्न विचारणं साहाजिक आहे.

इतर वेळेस वैयक्तिक आयुष्याबाबत ती कधीच काही बोलत नाही. अचानक हे सगळं तीचं बोलणं जरा धक्कादायकच आहे. म्हणूनच ही अभिनेत्री जेव्हा हे बोलली तेव्हा सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या. याचं एक वेगळंच कारण आहे ते अगदी खऱ्या चाहत्यांनी ओळखलच असावं. कतरिनाला 'कॅट'असं सर्वप्रथम सलमान खाननं नाव दिलं होतं.

 
सलमाननं तिला लाडानं दिलेलं हे नाव पुढं इंडस्ट्रीत पुढे आलं आणि जो-तो कतरिनाला कॅट असंच म्हणू लागला. सध्या सल्लूबरोबर केवळ शुटींगपुरते संबंध ठेऊन असणाऱ्या कतरिनाला आता त्यानं दिलेलं हे नावही नकोय. म्हणूनच तिनं 'मला कॅट कशाला म्हणता, मला ते अजिबात आवडत नाही' असं तिनं सरसकट सांगून टाकलं आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.