Crime News : मामीचा भाच्यासोबत बेडरूममध्ये रोमान्स, तेवढ्यात मामा आला अन्...

Extra Marital Affair : प्रेम आंधळ असतं पण नात्याच्या काळीमा फासणारी ही घटना अतिशय धक्कादायक आहे. लग्नानंतरच विवाहबाह्य संबंध समाजाला कळेल या भीतीतून एका गुन्हाचा जन्म होणे.   

नेहा चौधरी | Updated: Feb 8, 2025, 09:44 PM IST
Crime News : मामीचा भाच्यासोबत बेडरूममध्ये रोमान्स, तेवढ्यात मामा आला अन्... title=

Crime News : गेल्या काही वर्षांमध्ये नातेसंबंधांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदला आहे. लग्न हे दोन जीवाच मिलन मानलं जातं. लग्न हे प्रेम, विश्वास आणि आदर यावर उभं असतं. पण काळ बदला नात्यातून प्रेम, विश्वास, संवाद हरवत चालला आहे. अपेक्षा की अजून काही पण कारणं वेगळी आहेत, नात्याचा बंधनांना मोडून लोक अनैतिक संबंधांकडे वळत आहे. है अनैतिक आहे समजूनही त्यात पडतात आणि त्यातून गुन्हेगारीचा जन्म होतो. अशीच एक विचित्र आणि धक्कदायक घटना समोर आलीय. मामीचं भाच्यासोबत विवाहबाह्य संबंध होते यातून मामाने त्याचा छडा लागला अन् त्यातून मोठी घटना घडली. 

नात्याला काळीमा फासणारी घटना

 उत्तर प्रदेशामध्ये एका विवाहितेने आपल्या भाच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते. पतीने रंगेहाथ पकडल्यावर समाजात नाचक्की होण्याच्या भीतीने दोघांनी त्यांनी पतीला मृत्यूला स्वाधिन केलं.  उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये नात्यांना काळीमा फासणारी घटने सर्वांना धक्का बसलाय. एक मामी आपल्याच भाच्याच्या प्रेमात पडल्याची घटना समोर आली आहे. एकदा घरात कोणी नाही पाहता मामी आणि भाचा बेडरुममध्ये शारीरिक संबंध ठेवत होते. पण अचानक मामा घरी आला आणि त्यांनी दोघांना रंगेहात पकडलं. यानंतर तिघांमध्ये प्रचंड वादावादी आणि भांडणं झाली. नवऱ्याने पकडल्यानंतर समाजात आपली नाचक्की होईल म्हणून मामीने मोठं पाऊल उचललं. महिलेने प्रियकर भाच्याच्या मदतीने आपल्या नवऱ्याचा गळा दाबून खून केला. 

दरम्यान खैरगड विभागातील सिरमई गावात राहणाऱ्या सत्येंद्र सिंह (40) याचा अचानक मृत्यू झाल्याचं कळाल्यावर परिसरात खळबळ माजली. पोलिसांनी घटनेची चौकशी सुरु केली. सत्येंद्र यांची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचं पोलिसांना तपासात पुढे आलं. मृताची पत्नी रोशनी हिची चौकशी करताना पोलिसांनी ती उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. रोशनीची पोलिसांनी कसून चौकशी केली. तिला पोलिसांनी धारेवर धरल्यावर सर्व गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी महिला आणि तिच्या भाचाला अटक केली. 

रोशनीनी पोलिसांना सांगितलं की तिचा भाचा गोविंदशी तिचे विवाहबाह्य संबंध होते. घटनेच्या रात्री सत्येंद्रने त्या दोघांना शारीरिक ठेवताना रंगेहात पकडले. त्यानंतर समाजाच्या भीतीने आम्ही पती सत्येंद्र यांचा खून करण्याचं ठरवलं आणि दोघांनी मिळून त्यांचा गळा आवळून खून केला.