मुंबईत तलावात विसर्जनासाठी नेलेला गणपती पुन्हा मंडपात आणून ठेवावा लागाला; 'या' कारणामुळे BMC ने परत पाठवले

मुंबईत चारकोपचे गणपती विसर्जन तलावात पालिका व पोलिसांनी करून दिले नाही. हे गणपती पुन्हा मंडपात आणून ठेवण्यात आले आहेत.   

वनिता कांबळे | Updated: Feb 8, 2025, 09:30 PM IST
 मुंबईत तलावात विसर्जनासाठी नेलेला गणपती पुन्हा मंडपात आणून ठेवावा लागाला; 'या' कारणामुळे BMC ने परत पाठवले title=

Maghi Ganpati 2025 : मुंबईत गणेश उत्सवा प्रमाणे माघी गणेशोत्सव देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. घरगुती तसेच सर्वाजनिक मंडळे देखील माघी गणेश उत्सवाचे आयोजन करतात. माघी गणेशोत्सवातील सात दिवसांच्या गणपतीचे शनिवारी विसर्जन झाले. मात्र, मुंबईत विसर्जनादरम्यान विचित्र घटना घडली. मुंबईत तलावात विसर्जनासाठी नेलेला गणपती पुन्हा मंडपात आणून ठेवावा लागाला. मुंबई महापालिकेने या मंडळाला विसर्जनाची परवानगी नाकारली. 

मुंबईत शनिवारी सात दिवसांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन करण्याकरीता मुंबई महापालिकेने तलावांच्या ठिकाणी विशेष व्यवस्था केली आहे. मुंबईतील चारकोप येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणपती बाप्पाच्या विसर्जनाकरीता तलावावरती गेले असता पालिका प्रशासन आणि पोलिसांनी त्यांनी विसर्जनाची परवानगी नाकारली.   गणपती बाप्पाची मूर्ती ही पीओपीची असल्याकारणाने विसर्जन तलावात विसर्जन करण्यास मुंबई महापालिकेने परवानगी नाकारली.  

यावेळी पोलिस व पालिका अधिकाऱ्यांसोबत मंडळाचा वाद झाला. मात्र मध्यम मार्ग निघाला नाही. यामुळे गणपती पुन्हा मंडपात घेऊन जाण्यास सांगीतले. यामुळे  आता या मंडळांनी पुन्हा गणपती मंडपात आणून बसवला आहे.
माघी गणेशउत्सवात POPच्या गणेश मूर्तीवर घातलेली बंदी कायम ठेवली आहे. POPच्या गणेश मूर्तींची विक्री, तसंच स्थापनेला आणि त्या मुर्तींचं नैसर्गिक जलाशयांत विसर्जन करता येणार नाही असे अंतरिम आदेश मुंबई हायकोर्टानं काढले आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा, असेही निर्देश न्यायालयाने सरकारला दिले आहेत.

रायगड जिल्ह्यातल्या मानिवली गावात सार्वजनिक माघी गणेशोत्सव आयोजित करण्यात आलाय. 5 दिवसांच्या या गणेशोत्सवामार्फत वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जातात. हुतात्मा स्मारक समितीचे अध्यक्ष प्रवीण डायरे यांच्या माध्यमातून गेल्या 11 वर्षांपासून माघी गणेशोत्सवाचं आयोजन केलं जातंय.