Richest Area In Nashik : नाशिक म्हणजे महाराष्ट्राची धार्मिक राजधानी. त्र्यंबकेश्वरसह गोदवरी नदीच्या तीरावर असलेली अनेक तीर्थस्थळे. नाशिकमध्ये नेहमीच भक्तांचा मेळा भरलेला आहे. पर्यटन नगरी अशी देखील नाशिकची ओळख आहे. पर्यटनासह नाशिकची द्राक्ष देखील खूपच फेमस आहे. द्राक्ष शेती करणारे अनेक बायदार लखपती आहेत. पर्यटन आणि शेतीसह अनेक वाईन फॅक्ट्री देखील नाशिकमध्ये आहेत. यामुळे नाशिक शहर देखील खूपच्या चांगल्या रितीने विकसीत झाले आहे. जाणून घेऊया नाशिक मधील सर्वात श्रीमंत एरिया कोणते?
नाशिक हे महाराष्ट्रातील सर्वात जुने शहर आहे. महाराष्ट्राचेच नव्हे तर भारताचेही एक प्रमुख आर्थिक केंद्र आहे. पर्यटन आणि शेती यासह औद्योगिक विकासासह अनेक उद्योगांचे नाशिक मोठे हब बनले आहे. यामुळेच व्यवसायाच्या निमित्ताने अनेकजण नाशिकमध्ये स्थायिक होत आहेत. नाशिकमधील काही परिसर हे पॉश आणि श्रीमंत परिसर म्हणून ओळखले जात आहेत.
गंगापूर रोड हा नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला परिसर आहे. गंगापूर रोड नाशिक आंतरराष्ट्रीय विमानतळापासून 27 किमी अंतरावर आहे . नाशिक रोड रेल्वे स्टेशन हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे. 16 किमी अंतरावर हे स्टेशन आहे. सुला वाईन्स पासून हा एरिया जवळ आहे.
इंदिरा नगर हा देखील नाशिकच्या पॉश एरियापैकी एक आहे. इंदिारा नगर नाशिक शहराच्या पश्चिम भागात आहे. नाशिक आंतरराष्ट्रीय विमानतळ 25 किमी अंतरावर आहे. नाशिक रोड रेल्वे स्टेशन 83 किमी अंतरावर आहे.
पाथर्डी फाटा हा मुंबई-आग्रा महामार्गालगतचा एक जंक्शन परिसर आहे. यामुळेच पाथर्डी फाटा परिसर हा नाशिकमधील झपाट्याने विकसीत होणारा परिसर आहे. नाशिक आंतरराष्ट्रीय विमानतळ 27 किमी तर नाशिक रोड रेल्वे स्थानक 9 किमी अंतरावर आहे.
गोविंद नगर हा नाशिकमधील सर्वात सुंदर पॉश एरियांपैकी एक आहे. नाशिक फ्रीवे, राष्ट्रीय महामार्ग 50 आणि मुंबई आग्रा रोडमुळे हा एरिया कनेक्टीव्हीटीच्या बाबतीत एकदम बेस्ट ऑप्शन आहे. नाशिक शहराच्या आणि राज्याच्या सर्व भागांमधून येथे सहज पोहोचता येते. नाशिक आंतरराष्ट्रीय विमानतळ 22 किमी अंतरावर आहे. तर, नाशिक रोड रेल्वे स्टेशन 9 किमी अंतरावर आहे.
महात्मा नगर हा नाशिकमधील सर्वात पॉश एरिया आहे. नाशिक आंतरराष्ट्रीय विमानतळापासून 25 किमी तर नाशिक रोड रेल्वे स्थानकापासून 12 किमी अंतरावर आहे.