'धरती पर बडा कन्फ्युजन है भाई'; 'पीके' अडचणीत!

आमिर खानचा बहुचर्चित आणि सिनेपरिक्षकांनी उचलून धरलेला सिनेमा 'पीके' प्रदर्शनानंतर अडचणीत आलाय. हिंदू जनजागृती समितीनं या सिनेमाविरोधात मुंबई आणि नागपूर पोलीस आयुक्तांकडे लिखित तक्रार दाखल केलीय. 

Updated: Dec 24, 2014, 08:06 AM IST
'धरती पर बडा कन्फ्युजन है भाई'; 'पीके' अडचणीत! title=

मुंबई : आमिर खानचा बहुचर्चित आणि सिनेपरिक्षकांनी उचलून धरलेला सिनेमा 'पीके' प्रदर्शनानंतर अडचणीत आलाय. हिंदू जनजागृती समितीनं या सिनेमाविरोधात मुंबई आणि नागपूर पोलीस आयुक्तांकडे लिखित तक्रार दाखल केलीय. 

समितीच्या म्हणण्यानुसार, या सिनेमात वापरले गेलेल्या संवादांमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या जात आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर, जे घाबरतात तेच मंदिरात जातात... शिव को दूध चढाना अंधश्रद्धा है... मंदिर बांधणं, तीर्थयात्रेला जाणं हा काही धर्माचा भाग नाही अशा आशयाचे संवाद किंवा हरवलेल्या व्यक्तीच्या नावावर हिंदू देवता हनुमान, श्रीराम, श्रीकृष्णाचे पोस्टर्स लावण्याची दृश्यं या सिनेमात वापरली गेल्याचं 'हिंदू जनजागृती समिती'चं म्हणणं आहे. 

यामुळेच, सिनेमाच्या निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, लेखक आणि डिस्ट्रीब्युटर्सवर भारतीय दंड संहितेनुसार कलम १५३ (अ), २९५ (अ) नुसार खटला दाखल करण्यात यावा, अशी समितीनं मागणी केलीय. 

समितीनं मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांची भेट घेऊन सिनेमातून वादग्रस्त संवाद हटवले जात नाहीत तोवर सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी आणण्याची मागणी केलीय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.