लायसन्स नसताना सलमान चालवत होता गाडी

काळवीट शिकार प्रकरणी ठपका ठेवलेला अभिनेता सलमान खान यांच्याकडे वाहन चालवण्याचा वैध परवाना नव्हता, अशी माहिती पुढे आली आहे. याबाबत साक्ष आरटीओ अधिकार्‍याने सोमवारी सत्र न्यायालयात दिली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 17, 2015, 01:03 PM IST
लायसन्स नसताना सलमान चालवत होता गाडी title=

मुंबई : काळवीट शिकार प्रकरणी ठपका ठेवलेला अभिनेता सलमान खान यांच्याकडे वाहन चालवण्याचा वैध परवाना नव्हता, अशी माहिती पुढे आली आहे. याबाबत साक्ष आरटीओ अधिकार्‍याने सोमवारी सत्र न्यायालयात दिली.

वांद्रे येथे भरधाव गाडी चालवत सलमानने चौघांना चिरडले. यात एकाचा बळी गेला. याप्रकरणी सलमानविरोधात सदोष मनुष्यवधाचा खटला सुरू आहे. हिट अँण्ड रनची घटना घडली तेव्हा म्हणजे २००२ मध्ये त्याच्या वाहन चालवण्याच्या परवान्याचे २००४ मध्ये नूतनीकरण झाले, अशी साक्ष अंधेरी आरटीओच्या एका अधिकार्‍याने दिली. त्यामुळे सलमान अडचणीत आलाय.

सलमानच्या वाहन परवान्याचा लेखी तपशीलही त्यांनी न्यायालयात सादर केला.
अपघातानंतर सलमानला जे. जे. रुग्णालयात रक्त चाचणीसाठी नेणार्‍या पोलीस अधिकार्‍याचीही साक्ष या वेळी नोंदवली. त्यानंतर सलमानने मद्यपान केले होते की नाही, याची चाचणी करताना नियमांचे पालन झाले नाही, असा आरोप बचाव पक्षाने केला. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.