मुंबई : अभिनेत्री आणि मॉडेल जिया खान मृत्यु प्रकरणात अभिनेता सुरज पंचोली याला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलाय.
जिया खान मृत्यू प्रकरणी सीबीआय कस्टडीत असलेला सुरज पंचोलीचा पासपोर्ट त्याला परत देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला दिलेत.
पासपोर्ट पोलिसांच्या ताब्यात असल्याने गेली दोन वर्षे सुरज पंचोलीचे परदेशातील शुटींग आणि कामे रखडली होती... त्यासाठी सुरजला आता भारताबाहेर जाता येणार आहे.
पण हे आदेश देताना मुंबई न्यायालयाने सुरज पंचोलीवर काही अटी देखील ठेवल्या आहेत. सुरजला त्याचा पासपोर्ट न्यायालयात जमा करावा लागेल, त्याला परदेशात जाण्याआधी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे. तसंच तो कुठे आणि किती दिवस चालला आहे? याबाबत त्याला सर्व माहिती न्यायालयाला द्यावी लागणार, परदेशातून परत आल्यावर पासपोर्ट पुन्हा न्यायालयात जमा करावा लागेल. या अटी मान्य केल्यावरच सुरजला त्याचा पासपोर्ट मिळेल.