रणबीर कपूरला आपल्या घरी येण्यास करीनाचा नकार

करीना कपूर-खानला नेहमीच आपल्या भावा-बहिणींसोबत वेळ घालवायला आवडतो. मात्र त्यांनी भाऊ रणबीर कपूरला रात्री 2 वाजता आपल्या घरी येण्यास नकार दिलाय.

Updated: Jun 30, 2014, 01:44 PM IST
रणबीर कपूरला आपल्या घरी येण्यास करीनाचा नकार title=
फाईल फोटो

मुंबई: करीना कपूर-खानला नेहमीच आपल्या भावा-बहिणींसोबत वेळ घालवायला आवडतो. मात्र त्यांनी भाऊ रणबीर कपूरला रात्री 2 वाजता आपल्या घरी येण्यास नकार दिलाय.

एका इंटरव्हूय दरम्यान करीना कपूरनं सांगितलं, ‘रणबीर कपूर नेहमी रात्री उशीरा आपल्या मित्रांच्या घरी जातो. एकदा त्यानं मलाही म्हटलं, की मी रात्री येईल तुझ्या घरी, मात्र मी त्याला सांगितलं रात्री 2 वाजता माझ्या घरी येवू नको. आमच्याकडे कोणीही इतक्या रात्री जागं नसतं आम्ही 12 वाजता झोपून जातो.’

करीनानं सांगितलं की तिचं आणि रणबीरचं बोलणं तसं कमीच होतं. मात्र जेव्हाही बोलतो ते मजेदार असतं. तिनं एक किस्साही सांगितला, करीना म्हणाली, ‘एकदा रात्री दोन वाजता रणबीरचे दोन मिस्ड कॉल दिसले. तेव्हा तो साऊथ आफ्रिकेत होता. दुसऱ्या दिवशी मी फोन केला आणि विचारलं तर रणबीरनं सांगितलं की त्यानं फोन नाही केलाय. चुकून डायल झाला होता. पण त्यामुळं आमचं बोलणं तरी झालं’.

करीनाचा आणखी एक भाऊ अरमान जैननं पण बॉलिवूडमध्ये एंट्री घेतलीय. करीना म्हणते कुटुंबातील जास्त लोकांसोबत काम करायला मला आवडतं. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.