मुंबई : कतरिना कैफ आणि रणबीर कपूर यांचे वैयक्तिक जीवनातील संबंध संपुष्टात आले असले तरी त्यांना व्यावसायिक संबंधांमुळे एकमेकांसमोर उभं राहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
याआधीच आपलं नात संपवल्याचा आर्थिक फटका दोघांनाही बसलेला आहे... शिवाय, जग्गा जासूस या सिनेमाचं शूटही संपवायचं अजून बाकी आहे... त्यामुळे या चित्रपटाच्या शुटिंगच्या निमित्तानं हे एकेकाकळ लव्हबर्ड पुन्हा एकदा एकत्र दिसलं.
Video - A closer look of Katrina Kaif & Ranbir Kapoor's adorable #JaggaJasoos dance routine! pic.twitter.com/uEKad0Tmyi
— Katrina Kaif Online (@KatrinaKaifFB) May 12, 2016
नातं तुटल्यानंतर नाईलाजानं का होईना पण त्यांना एकमेकांना सहन करावं लागतंय. 'जग्गा जासूस'च्या मोरोक्कोमधल्या शुटिंगदरम्यानचा या दोघांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये हे दोघंही एक रोमान्टिक डान्स करताना दिसत आहेत.
Ranbir Kapoor and Katrina Kaif shooting for #JaggaJasoos in Morocco pic.twitter.com/6R68dkv4FC
— RanbirKapoor.Net (@RanbirKapoorFC) May 12, 2016