अश्लील कमेंट करून 'केआरके' पुन्हा पडला तोंडावर

सोशल वेबसाईटसवर वादग्रस्त वक्तव्य करून किंवा अश्लील कमेंट करून हेडलाईन्समध्ये राहण्याचं कसब केआरके म्हणजेच कमाल रशीद खान याला चांगलंच जमलंय... गंमत म्हणजे, अनेकदा तोंडावर पडूनसुद्धा तो काही सुधारायचं नाव घेत नाही.

Updated: Feb 5, 2015, 07:58 AM IST
अश्लील कमेंट करून 'केआरके' पुन्हा पडला तोंडावर title=

मुंबई : सोशल वेबसाईटसवर वादग्रस्त वक्तव्य करून किंवा अश्लील कमेंट करून हेडलाईन्समध्ये राहण्याचं कसब केआरके म्हणजेच कमाल रशीद खान याला चांगलंच जमलंय... गंमत म्हणजे, अनेकदा तोंडावर पडूनसुद्धा तो काही सुधारायचं नाव घेत नाही.

सोनाक्षी सिन्हा हिच्यानंतर आता केआरकेनं बॉलिवूड अभिनेत्री लीजा हेहन हिच्यावर अश्लील कॉमेंट केलीय... तीही सोशल वेबसाईटवर

नुकतंच लीजानं आपल्या फॅन्ससाठी आपल्या ट्विटरवरून एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोत लीझा एका बास्केट बॉल कोर्टात हवेत तरंगताना दिसत होती. यावर, केआरकेनं ट्वट करत लिहिलं, 'यार  लीझा मी तुला खाली बसून बघू का?'

कमाल खानच्या या बेताल कमेंटवर लीजानं रिट्विट करत लिहिलं की 'कमाल आर खान तुझ्यासारख्या अगोदरपासून पडलेल्या व्यक्तीला खुर्चीची गरज नाही'

लीजाच्या या उत्तरावर चिडलेल्या केआरकेनं पुन्हा ट्विट करून  म्हटलं 'लीजा, तुझा हा फोटो पाहून लोक तुझी पूजा किंवा आरती करणार नाही'... इतक्यावरच तो थांबला नाही, तर त्यानं 'लीजा तुझ्या आणि माझ्या फॉलोअर्सला मोज... मग तुला कळेल की मी किती मोठा स्टार आहे. त्यामुळे माझ्याशी शिस्तीत वाग' असंही त्यानं ट्विट केलं.

त्यानंतर, मात्र काही वेळाने केआरकेनं स्वत:च सगळे ट्विटस् हटवले.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.