'महाभारत'चे दिग्दर्शक रवी चोप्रा यांचं निधन

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक रवि चोप्रा यांचं आज मुंबईत निधन झालं. ते ६८ वर्षांचे होते. बागवान, द बर्निंग ट्रेन,बाबुल या सिनेमाचं दिग्दर्शन  रवि चोप्रा यांनी केलं होतं. तसंच 80च्या दशकात गाजलेल्या महाभारत या टीव्ही सिरिअलचं दिग्दर्शनही त्यांनी केलं होतं.

Updated: Nov 12, 2014, 07:05 PM IST
'महाभारत'चे दिग्दर्शक रवी चोप्रा यांचं निधन title=

मुंबई: बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक रवि चोप्रा यांचं आज मुंबईत निधन झालं. ते ६८ वर्षांचे होते. बागवान, द बर्निंग ट्रेन,बाबुल या सिनेमाचं दिग्दर्शन  रवि चोप्रा यांनी केलं होतं. तसंच 80च्या दशकात गाजलेल्या महाभारत या टीव्ही सिरिअलचं दिग्दर्शनही त्यांनी केलं होतं.

त्यांना फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त होते. गुरुवारी त्यांची प्रकृती बिघडल्यामुळं त्यांना  ब्रिच कँडी रुग्णालयात भरती करण्यात आलं. आज दुपारी 3 वाजता त्यांनी ब्रिच कँडी रुग्णालया अखेरचा श्वास घेतला. 

छोट्या पडद्यावरील महाभारत आणि रामायण या मालिकांमुळे रवी चोप्रा प्रसिद्धीच्या झोतात आले होते. ते दिवंगत सिने निर्माते आणि दिग्दर्शक बी.आर. चोप्रा यांचे पुत्र होते. रवी चोप्रा यांनी निर्मिती केलेले भूतनाथ रिटर्न्स हा त्यांचा नुकताच प्रदर्शित झालेला सिनेमा होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.