या महिलेच्या शोधात अख्खं गाव, पोलीस आणि गुंडही पाठीमागे

अशा एका महिलेला शोधण्यासाठी अख्खं गाव कामाला लागलेय. गावातील लोकांबरोबरच पोलीस आणि गुंडही या महिलेचा शोध घेत आहेत.  

Updated: Jun 16, 2016, 08:30 PM IST
या महिलेच्या शोधात अख्खं गाव, पोलीस आणि गुंडही पाठीमागे title=

मुंबई : अशा एका महिलेला शोधण्यासाठी अख्खं गाव कामाला लागलेय. गावातील लोकांबरोबरच पोलीस आणि गुंडही या महिलेचा शोध घेत आहेत. ही गोष्ट आहे १७ जून रोजी रिलीज होणाऱ्या 'भूरी' या सिनेमातील अभिनेत्री माशा पौरची. स्कॉलॅंटची माशाचा हा पहिला सिनेमा आहे.

दिग्दर्शक जसबीर भाटी याने 'भूरी' सिनेमा केलाय. या सिनेमाची कथा स्त्री प्रधान आहे. गावातील लोकांची नजर एका स्त्रीवर फोकस करण्यात आलेय. या सिनेमात एका महिलेचा विवाह शेतकऱ्याशी होतो. त्यानंतर ती सासरी जाते, त्यावेळी तिला पाहण्यासाठी लोकांची गर्दी होते. त्यानंतर या महिलेच्य पतीला अनेक प्रकारच्य समस्यांचा सामना करावा लागतो. 

या सिनेमात महिलांप्रती समाजाची वाईट बुद्धी दाखविण्याचा प्रयत्न केला गेलाय. या सिनेमात माशा शिवाय रघुवीर यादव, आदित्य पांचोली, कुनिका सदानंद लाल, शक्ती कपूर, मोहन जोशी, मुकेश तिवारी, मनोज जोशी, सीताराम पांचाळ आदी आहेत.