'नटसम्राट'चा तीन दिवसांत १० कोटींचा गल्ला

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांच्या भेटीस आलेला नटसम्राट बॉक्स ऑफिसवर सुस्साट धावतोय. एक जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित झालाय.

Updated: Jan 5, 2016, 12:01 PM IST
'नटसम्राट'चा तीन दिवसांत १० कोटींचा गल्ला title=

मुंबई : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांच्या भेटीस आलेला नटसम्राट बॉक्स ऑफिसवर सुस्साट धावतोय. एक जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित झालाय.

अधिक वाचा - नटसम्राट : महान नटाची शोकांतिका 

प्रदर्शनानंतर तीन दिवसांत या चित्रपटाने तब्बल १० कोटींचा गल्ला जमवलाय. प्रेक्षकांची जबरदस्त पसंती या चित्रपटाला मिळतेय. महेश मांजेरकर दिग्दर्शित या चित्रपटात नाना पाटेकर या दिग्गज अभिनेत्याने आप्पासाहेब बेलवलकर ही भूमिका साकारलीय. 

अधिक वाचा - अमिताभ बच्चन यांनी केली नाना पाटेकरांच्या 'नटसम्राट'ची प्रशंसा 

कुसुमाग्रज यांच्या नटसम्राट या रंगभूमीवरील गाजलेली कलाकृती मांजरेकरांनी रुपेरी पडद्यावर आणली. त्याला प्रेक्षकांचाही तगडा प्रतिसाद मिळतोय. यापूर्वी चित्रपटाच्या ट्रेलरही प्रेक्षकांनी पसंती दर्शवली होती. 

अधिक वाचा - व्हिडिओ : नाना पाटेकरांच्या 'नटसम्राट'चा ऑफिशल ट्रेलर