पुणे : प्रदर्शना आधी पीके हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. अभिनेता आमीर खानची प्रमुख भूमिका चित्रपटात आहे. संजय दत्तनेही या चित्रपटात आमीर खान याच्या मित्राची भूमिका साकारली आहे.
मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या संजय दत्त याच्यासाठी "पीके‘ या चित्रपटाचा खास शो सादर करण्याच्या अभिनेता आमीर खान याच्या प्रयत्नांना कारागृह प्रशासनाने धक्का दिला आहे.
आमीर खान याचा संजय दत्तसोबतचा हा पहिलाच चित्रपट असल्याने त्याचा खास शो त्याच्यासाठी सादर करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे वक्तव्य आमीर खान याने केले होते. त्यामुळे शिक्षा भोगत असलेल्या कैद्यासाठी एखाद्या चित्रपटाचा प्रयोग सादर करण्याचा पहिलाच प्रसंग राज्यात घडणार होता.
याबाबत राज्याच्या कारागृह विभागाच्या प्रमुख मीरा बोरवणकर म्हणाल्या, कायदा सर्वांसाठी समान असतो आणि सर्व कैदी हे समान असल्याचे सांगून त्यांनी आमीर खान याच्या स्वप्नांना सुरुंग लावला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.