नवी दिल्ली : बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी वादग्रस्त ठरलेला पाकिस्तान गायक अदनान सामी याला भारतात अमर्याद काळासाठी वास्तव्य करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
ही परवानगी मानवतेच्या आधारावर देण्यात आल्याची माहिती परराष्ट्र राज्यमंत्री किरण रिज्जू यांनी आज लोकसभेत दिली. सामी याने अमर्याद काळासाठी भारतात राहण्याची कायदेशीर परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती.
सामीने केंद्रीय गृहमंत्रालयाकडे अर्ज सादर केला होता. सामी याचा जन्म लोहोरमध्ये झालाय. १३ मार्च २००१ मध्ये सामी याने एक वर्षासाठी पर्यटक व्हिसा घेऊन भारतात आला होता. तेव्हापासून तो भारतात राहत आहे. दरम्यान, २६ मे २०१५ रोजी त्याच्या पासपोर्टची वैधता संपली होती. त्याच्या भारतात राहण्यावर काही राजकीय नेत्यांनी आक्षेप घेतला होता. त्याला पाकिस्तानात पाठवून देण्याची मागणी केली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.