धमाकेदार ट्रेलरनंतर सलमानच्या 'प्रेम रतन धन पायो'चं पहिलं गाणं रिलीज

बॉलिवूडचा दबंग सलमान खान तब्बल १६ वर्षांनी सूजर बडजात्यांच्या 'प्रेम'च्या भूमिकेत येतोय. त्याचा आगामी चित्रपट 'प्रेम रतन धन पायो' दिवाळीत १२ नोव्हेंबरला रिलीज होतोय. त्यापूर्वी चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज झालंय.

Updated: Oct 7, 2015, 01:49 PM IST
धमाकेदार ट्रेलरनंतर सलमानच्या 'प्रेम रतन धन पायो'चं पहिलं गाणं रिलीज title=

मुंबई: बॉलिवूडचा दबंग सलमान खान तब्बल १६ वर्षांनी सूजर बडजात्यांच्या 'प्रेम'च्या भूमिकेत येतोय. त्याचा आगामी चित्रपट 'प्रेम रतन धन पायो' दिवाळीत १२ नोव्हेंबरला रिलीज होतोय. त्यापूर्वी चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज झालंय.

आणखी वाचा - रिलीज पूर्वीच सलमानच्या 'प्रेम रतन धन पायो'चं रेकॉर्ड तोडणं सुरू!

'प्रेम लीला' हे गाणं अमन त्रिखा आणि विनीत सिंग यांनी हे गाणं गायलं आहे. तर हिमेश रेशमिया यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे.

आणखी वाचा - तरुणींनी सलमानचं हृदय नाही... तर पाकिट आणि वस्तू लुटल्या!

चित्रपटात सलमानसोबत सोनम कपूर मुख्य भूमिकेत आहे. हे दोघं याआधी 'सावारियाँ'मध्ये दिसले होते. चित्रपटाच्या ट्रेलरनं अवघ्या पाच दिवसांत रेकॉर्ड केलाय. तब्बल १ कोटी लोकांनी ट्रेलर पाहिला. आता सलमानचं हे गाणं काय कमाल करतं, ते पाहावं लागेल. 

पाहा व्हिडिओ - 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.