चित्रपटाचे नाव : प्रेम रतन धन पायो
डायरेक्टर : सूरज बड़जात्या
स्टार कास्ट: सलमान खान, सोनम कपूर, दीपराज राणा, नील नितिन मुकेश, स्वरा भास्कर, अनुपम खेर, अरमान कोहली, दीपक डोबरियाल
कालवधी : 2 तास 54 मिनिट
सर्टिफिकेट: U
रेटिंग: 3 स्टार
सुमारे २७ वर्षांपूर्वी दिग्दर्शक सूरज बडजात्याने इंडस्ट्रीत प्रेमच्या रूपात सलमान खानला आणले होते. मैने प्यार किया मधील सलमानच्या भूमिका खूप लोकप्रिय झाली. त्यानंतर हम आपके है कौन आणि हम साथ साथ है मधीलही प्रेम लोकांना खूप आवडला.
अधिक वाचा - प्रेम रतन धन पायो'चा ट्विट रिव्ह्यू
आता १६ वर्षांनंतर पुन्हा एकदा सलमान खान आणि सूरज बडजात्या एकत्र येऊन 'प्रेम रतन धन पायो' हा चित्रपट केला आहे, तो चित्रपटगृहात रिलीजही झाला आहे. आता प्रश्न हा आहे की सूरज बडजात्याच्या या चित्रपटाला २०१५ मधील प्रेक्षक पसंत करतील का? कमर्शियल युगात हा कौटुंबिक चित्रपट पाहिला जाईल का? चला करू या चित्रपटाची समिक्षा
कहाणी -
ही कहाणी अयोध्यामध्ये राहणाऱ्या प्रेम (सलमान खान) याची आहे. तो मोठ्या मनाचा माणूस आहे. रामलीला त्याला तोंडपाठ आहे, आपल्या धुंदीत तो राहतो. प्रेम आपली कमाई तेथील राजकुमारी मैथिली (सोनम कपूर) हिच्या चॅरिटेबल ट्रस्टला दान करतो. त्यानंतर राजकुमारी मैथिलीला भेटण्यासाठी मित्र कन्हैया (दीपक डोबरियाल) सह राजमहलात जातो. प्रेमला मैथिलीचा स्वभाव खूप आवडतो. ती सर्वांची मदत करते. विशेष म्हणजे पूर परिस्थितीत ती लोकांना खूप मदत करते. प्रेमला काही दिवसातच मैथिलीशी भेटण्याची संधी मिळते आणि प्रेमाचं वातावरण तयार होऊ लागतं.
त्याचवेळी काहणीत राजकुमार विजय (सलमान खान), त्याच्या सावत्र बहिणी स्वरा भास्कर (चंद्रिका) आणि आशिका भाटिया (राधिका) आणि भाऊ अजय तसेच देखभाल करणारा चिराग (अरमान कोहली) दिवाण (अनुपम खेर) यांची एन्ट्री होते. कौटुंबिक चढउताराची नंतर मालिका सुरू होते. नात्यांचा गुंता सोडवणे कठीण होऊ बसते. हा गुंता सुटतो का हे पाहण्यासाठी तुम्हांला चित्रपटगृहात जावे लागले.
स्क्रिप्ट -
चित्रपटाची कहाणी काल्पनिक आणि कौटुंबिक नात्यांच्या पायावर उभी करण्यात आली आहे. पण आजच्या युगात इतकी जुनी कल्पना काही पचनी पडत नाही. मिशी आणि बिना मिशीवाला व्यक्ती आपल्या जवळच्या लोकांना ओळखता येत नाही. दरम्यान चित्रपटावर करण्यात आलेला खर्च स्क्रिनवर दिसत आहे. पण तो वायफळ खर्च झाल्यासारखा वाटतो. सूरज बडजात्या यांनी वास्तविक परिस्थितीचे थोडे भान ठेवायला पाहिजे. भव्य सेट आणि उत्कृष्ट अभिनयात स्क्रिप्ट थोडी फिकी पडलेली वाटते. इंटरवेलपूर्वी तयार झालेलं वातावरण इंटरवेलनंतर विस्कळीत झालेले वाटते.
अभिनय -
दुहेऱी भूमिकेमध्ये सलमान खान याचा अभिनय आपल्या कॅरेक्टरला न्याय देणार आहे. तसेच चित्रपटातील इतर कलाकार जसे सोनम कपूर, स्वरा भास्कर, अनुपम खेर, नील नितीन मुकेश, अरमान कोहली, दीपक डोबरियाल, संजय मिश्रा, दीपराज राणा यांचा अभिनय सहज वाटला आहे.
संगीत
चित्रपटाचे संगीत पहिल्यापासून लोकप्रिय आहे. टायटल ट्क आणि काही गाण्यांना कमी केले असते तर चित्रपटाची लांबी कमी झाली असती.
कुठे पडले कमी
चित्रपटाची कमकुवत बाजू ही चित्रपटाची स्क्रिप्ट आणि गती आहे. स्क्रिप्ट अजून क्रिस्प झाली असती आणि गती वाढली असती. चांगल्या कलाकारांमुळे चित्रपट उत्कृष्ट होण्यात स्क्रिप्टमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. कहाणीवर अधिक लक्ष्य दिले असते तर चित्रपट वेगळ्या उंचीवर गेला असता.
का पाहायचा हा चित्रपट
सलमानमुळे हा चित्रपट पाहायला हवा. सूरज बडजात्याचे कौटुंबिक प्रेम आणि संपूर्ण स्वच्छ सिनेमा पाहायचा असेल तर हा चित्रपट नक्की पाहा. आपल्या परिवारासोबत चित्रपट पाहायचा असेल तर नक्की पाहा...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.