मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणसमोर एक यक्षप्रश्न उभा ठाकलाय. हा प्रश्न तिच्या व्यावसायिक जीवनाशी संबंधित आहे. मीडिया रिपोर्टनुसार दीपिका पदुकोणला दोन भूमिकांसाठी ऑफर आल्या आहेत यापैकी एक भूमिका तिला निवडायची आहे.
आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष? पण, यात विशेष असं की एक भूमिका तिला तिचा सध्याचा बॉयफ्रेंड रणवीर सिंगसोबत करायचीये तर दुसरी एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत. 'मिड डे डॉट कॉम'च्या मते तिला यातली एकच भूमिका निवडता येणार आहे. कारण, दोन्ही चित्रपटांचं शूटिंग एकाच वेळेस होणार आहे. त्यात दीपिकाचं शेड्यूलही जाम व्यस्त आहे.
'दीपिका तिला आलेल्या ऑफर्सविषयी कधीच बोलत नाही. त्यामुळे आम्ही यावर काही प्रतिक्रिया देणार नाही,' असं तिच्या प्रवक्त्याने सांगितलंय. त्यामुळे दीपिका रणवीर सिंग अथवा रणबीर कपूरसोबत काम करणार हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे.