मुंबई : यश राज फिल्मने पहिला भारतीय तृतीयपंथीय बँड लॉ़न्च केला असून त्याचे नाव '6 pack' ठेवण्यात आला आहे.
यातील सहा संगीतकार हे तृतीयपंथीय आहेत. याचे पहिलं गाणे 'हम है हॅप्पी' नुकतच रिलीज झाले असून या बँडला सहकार्य सोनू निगम याने केले आहे.
या व्हिडिओ अल्बमला अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने व्हॉइस ओव्हर दिला आहे. तसेच अनुष्काने आपल्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. ती म्हटले येथ शब्द हरतात आणि संगीत जिंकते.
यातील दुसरे गाणे २६ जानेवारी रोजी रिलीज होणार असून यात सोनू निगम दिसणार आहे. त्या गाण्याचे बोल आहे 'सब रब दे बंदे'
पाहा '6 pack' बँडचा पहिला व्हिडिओ...