मी रणबीरचा पोस्ट बॉक्स नाही, पापा ऋषी कपूर भडकले

बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर आजकाल सोशल नेटवर्किंग साइटवर आपल्या फॅन्ससोबत गप्पा मारत असतात. मात्र सध्या एका गोष्टीचा त्यांना त्रास होतोय. 

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Apr 22, 2015, 02:15 PM IST
मी रणबीरचा पोस्ट बॉक्स नाही, पापा ऋषी कपूर भडकले title=

नवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर आजकाल सोशल नेटवर्किंग साइटवर आपल्या फॅन्ससोबत गप्पा मारत असतात. मात्र सध्या एका गोष्टीचा त्यांना त्रास होतोय. 

आजकाल फॅन्स त्यांना त्यांच्याबद्दल कमी आणि रणबीरबद्दल जास्त विचारतात, मॅसेज करतात. यामुळं ऋषी कपूर चांगलेच चिडलेत आणि त्यांनी चक्क मी रणबीरचा पोस्ट बॉक्स नाही असं म्हणत त्याचा मॅसेज इथं टाकू नका, असं म्हटलंय. ऋषी कपूर यांनी एक फोटो शेअर करत आपली नाराजी व्यक्त केलीय. 

काही दिवसांपासून ऋषी कपूर आणि रणबीर कपूर यांच्यातील नातं बिघडलंय. याचं कारण म्हणजे कतरिना कैफ... ही बातमी चर्चेत आली जेव्हा कतरिना कैफ संपूर्ण कपूर फॅमिलीसोबत डिनरसाठी पोहोचली पण तिथं ऋषी कपूर नव्हते. डिनर पार्टीला आई नितू कपूरसह उर्वरित संपूर्ण कपूर कुटुंब उपस्थित होतं. 

भलेही पापा ऋषी कपूर नाराज झाले असतील. पण लाडका मुलगा गर्लफ्रेंड कतरिना सोबत मालदीवमध्ये सुट्ट्या एंजॉय करायला गेलाय. रणबीर तमाशाचं शूटिंग संपवून तिथं पोहोचला. तर कतरिनानं फितूरचं शूटिंग संपवून मालदीव गाठलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.